ETV Bharat / state

कर्मचाऱ्यांना कामावर पोहोचण्यासाठी दुचाकीला परवानगी मिळणार - mumbai corona updates

आता दुचाकीवरून कामावर पोहोचण्यासाठी निर्बंध शिथिल करण्यास उद्योग विभाग मान्यता देणार आहे. 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर' या शिखर संस्थेने आयोजित केलेल्या ई-सभेला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी दुचाकी संदर्भातील मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला.

उद्योगमंत्री सुभाष देसाई
उद्योगमंत्री सुभाष देसाई
author img

By

Published : Apr 27, 2020, 10:46 PM IST

मुंबई - केंद्राच्या निर्देशानुसार राज्यातील काही ग्रीन झोनमध्ये उद्योगांना काही अटींवर परवानगी दिली आहे. मात्र, दुचाकीच्या प्रवासावर निर्बंध असल्याने कर्मचाऱ्यांना कामावर पोहोचता येत नव्हते. आता दुचाकीवरून कामावर पोहोचण्यासाठी निर्बंध शिथिल करण्यास उद्योग विभाग मान्यता देणार आहे.

'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर' या शिखर संस्थेने आयोजित केलेल्या ई-सभेला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी दुचाकी संदर्भातील मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला.

दुचाकी वाहनांसाठी सध्या 10 किलोमीटर अंतराचे बंधन आहे. हे बंधन दूर करण्याची मागणी काही उद्योजकांनी यावेळी केली होती. तसेच उद्योजकांना जाणवणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी हेल्प डेस्क सुरू करू, असेही देसाई यांनी सांगितले. आपली खरी लढाई कोरोनाशी असून त्याचे सर्वांना भान ठेवावे लागेल. त्याचवेळी उद्योगचक्र सुरू करून अर्थव्यवस्थेला चालनाही द्यावी लागेल. हे कार्य परस्पर संवाद आणि सहकार्याने करू, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.

चेंबर्सच्या राज्यभरातील २५० पेक्षा अधिक उद्योजक, व्यापाऱ्यांनी या ई-सभेत सहभाग घेतला. कोरोनामुळे उद्योग क्षेत्राला व खास करून लघू, मध्यम उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत व्यापार व उद्योगांना जाणवणाऱ्या अडचणी तसेच टाळेबंदी संपल्यानंतर उद्योग सुरू करण्यासाठी येणाऱ्या अडचणी व त्यावर कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी उद्योगांना भांडवल उभारणी, कामगार नसणे, व्याज दर, बँकाचे कर्ज मिळणे, वीज बिल, पाणी बिल व विविध कर, कामगारांचे पगार, निर्यातीसाठी चालना मिळावी याकरिता प्रयत्न करणे, कृषी माल काढण्यासाठी मजुरांची उपलब्धता अशा अनेक अडचणी असल्याचे काही उद्योजक सदस्यांनी सांगितले.

उद्योग सुरू करण्याची गरज सरकारला समजल्यानंतर आम्ही तशी तयारी केली आहे. वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांचा कृतीगट स्थापन केला. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना डोळ्यासमोर ठेवून ऑनलाईन प्रक्रिया राबवून उद्योगांना परवाने दिले आहेत. आजपर्यंत पंचवीस हजारांपर्यंत उद्योग सुरू करण्यास परवानगी मागितली आहे. यावरही विचार सुरू असल्याचे देसाई यांनी सांगितले.

या चर्चासत्रामधे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अण्ड अँग्रिकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अण्ड इंडस्ट्रिजचे विवेक दालमिया, अमरावती चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीचे अध्यक्ष विनोद कलंत्री, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रिकल्चरचे अध्यक्ष राजू राठी, चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अँग्रिकल्चरचे अध्यक्ष गिरिधर संगनेरिया, इंडियन मर्चंट चेंबरचे अध्यक्ष आशिष वेद , एमइडीसीचे रवींद्र बोराटकर आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.