मुंबई - रमाबाई नगर मधील शांतीसागर पोलीस को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा अनेक वर्षे विकास रखडला होता. आज (दि. 19 जाने.) गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोसायटीचे सभासद रहिवासी व म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांच्या सोबत बैठक घेऊन पोलीस वसाहतीच्या 1 हजार 700 घराचा निर्माणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
शांतीसागर पोलीस को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या सभासदांनी रखडलेला कार्याची माहिती नुकतीच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना दिली होती. आव्हाड यांनी लवकरच मी पोलीस वसाहतीला भेट देऊन मार्ग काढू, असे आश्वासन सोसायटी सदस्यांना दिले होते. लवकरच या वसाहतीचे प्रकल्प निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते भूमिपूजन केले जाईल, असे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
हेही वाचा - 'संजय राऊतांना आपण काय बोलतोय याचे भान नाही'
1 हजार 700 घरांच्या प्रकल्पातील एक हजार घरे पोलीस कर्मचाऱ्यांना मिळतील तसेच शिल्लक 700 घरांची लॉटरी काढून तीही पोलिसांनाच दिले जातील, असे आव्हाड यांनी सांगितले.
हेही वाचा - मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेण्यासाठी आलेल्या वृद्धाचा मृत्यू