ETV Bharat / state

Jayant Patil On Devendra Fadnavis : उत्साहाच्या भरात महाराष्ट्र जिंकण्याचा दावा करणे चुकीचे - जयंत पाटील यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

author img

By

Published : Mar 11, 2022, 3:08 PM IST

पाचपैकी चार राज्यात भारतीय जनता पक्षाने सत्ता संपादन केली. ( Five State Election Results 2022 ) त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या उत्साहात नक्कीच वाढ झाली आहे. मात्र, उत्साहाच्या भरात महाराष्ट्रात जिंकण्याचा दावा भारतीय जनता पक्षात करत असेल तर हे चुकीचं असल्याचा टोला जलसंपदामंत्री जयंत पाटील ( Jayant Patil Replied to Devendra Fadnavis ) यांनी भाजपला लगावला आहे.

Minister Jayant Patil
जयंत पाटील

मुंबई - पाचपैकी चार राज्यात भारतीय जनता पक्षाने सत्ता संपादन केली. ( Five State Election Results 2022 ) त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या उत्साहात नक्कीच वाढ झाली आहे. मात्र, उत्साहाच्या भरात महाराष्ट्रात जिंकण्याचा दावा भारतीय जनता पक्षात करत असेल तर हे चुकीचं असल्याचा टोला जलसंपदामंत्री जयंत पाटील ( Jayant Patil Replied to Devendra Fadnavis ) यांनी भाजपला लगावला आहे. तसेच उत्तर प्रदेश मध्ये सर्वच विरोधात एकत्र येऊन लढली असते. तर, निकाल वेगळे असते.

मंत्री जयंत पाटील माध्यमांशी बोलताना

महाराष्ट्राच्या जनतेची मानसिकता वेगळी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारला कुठलाही धोका नसल्याचा विश्वास विधान भवनात प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी व्यक्त केला. तसेच गोव्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मोठे नेतृत्त्व नाही. निवडणुकीआधी काँग्रेससोबत येईल, असा विश्वास होता. मात्र, त्यांनी वेगळा मार्ग निवडला असल्याचे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

भाजपाच्या नेत्यांवरही कारवाई व्हावी -

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात नाही, असं पंतप्रधान म्हणतात. मात्र, जेथे भारतीय जनता पक्षात देशात राज्य सरकार नाही, अशा राज्याच्या नेत्यांवरच केंद्रीय तपास यंत्रणाची कारवाई होताना पाहायला मिळते. देशभरात अनेक राज्यात भारतीय जनता पक्षाची सरकार त्या नेत्यांवरही केंद्रीय तपास यंत्रणेचे कारवाई का होत नाही? असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांवर कोणताही दबाव आणला जात नाही. मात्र, सहा वाजता कोणतीही नोटीस न देता एखाद्या केंद्रीय मंत्र्यांना तपास यंत्रणेने नेण्यात कितपत योग्य? असा प्रश्न उपस्थित करत केंद्रीय तपास यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर ही जयंत पाटील यांनी सवाल उपस्थित केला आहे.

हेही वाचा - Nana Patole : ...तर भाजपला दोन खासदारांचा पक्ष होण्यास वेळ लागणार नाही -नाना पटोले

तसेच मुंबई महानगरपालिकेचे शिवसेनेच्या नेतृत्वात काम योग्यरीत्या सुरू आहे. मात्र, मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नांत मधूनच महानगरपालिकेत मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप भारतीय जनता पक्ष करत असल्याचे जयंत पाटलांनी यावेळी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.