ETV Bharat / state

राम मंदिराच्या निधीचा हिशोब ठेवण्यासाठी अराजकीय समिती तयार करावी - जयंत पाटील - राजकीय बातमी

अतिशय भक्तिभावाने राम मंदिर उभे व्हावे, अशी या देशातील रामभक्तांची इच्छा आहे. म्हणून रामभक्त मोठ्या प्रमाणावर निधी देत आहेत. मात्र, राम मंदिर उभारणीत गोळा होणार्‍या निधीत भ्रष्टाचार होत असेल तर हे दुर्दैवी आहे, अशी नाराजी मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

मंत्री जयंत पाटील
मंत्री जयंत पाटील
author img

By

Published : Jun 17, 2021, 8:10 PM IST

Updated : Jun 17, 2021, 8:55 PM IST

मुंबई - राम मंदिर उभारणीसाठी गोळा होणारा पैसा पारदर्शीपणाने खर्च होतो की नाही हे बघण्यासाठी देशातील राम भक्तांनी एक अराजकीय समिती तयार करावी. राम मंदिर उभारणीतील जमाखर्च आणि त्याचा हिशोब त्या समितीने निरीक्षणाखाली ठेवावा, असे आवाहन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे. प्रामाणिकपणे मंदिराचे पावित्र्य राखून राम मंदिर उभे राहावे, अशी राम भक्तांची अपेक्षा असल्याचेही मंत्री पाटील म्हणाले.

बोलताना मंत्री जयंत पाटील

राम मंदिरासाठीच्या निधीत भ्रष्टाचार अत्यंत दुर्दैवी

अतिशय भक्तिभावाने राम मंदिर उभे व्हावे, अशी या देशातील रामभक्तांची इच्छा आहे. म्हणून रामभक्त मोठ्या प्रमाणावर निधी देत आहेत. मात्र, राम मंदिर उभारणीत गोळा होणार्‍या निधीत भ्रष्टाचार होत असेल तर हे दुर्दैवी आहे, अशी नाराजीही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

रामाचे नाव घेऊन राजकीय व आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न

राम मंदिर बांधताना हे लोक भ्रष्टाचार करत असतील तर राम यांच्यापासून किती लांब आहे आणि रामापासून हे किती लांब आहेत हे स्पष्ट होते. रामाचा फायदा घेऊन कसे वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय आणि आर्थिक फायदे मिळवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत, हे यानिमित्ताने समोर आले आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी भाजपचे नाव न घेता यावेळी केली.

हेही वाचा - मुंबईकरांवर मालमत्ता कर वाढीचा बोजा लादणार नाही - महापौर

Last Updated : Jun 17, 2021, 8:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.