ETV Bharat / state

मध्यप्रदेशसारखा आनंद महाराष्ट्र भाजपला शक्य नाही - धनंजय मुंडे - political news

मध्यप्रदेशमध्ये झालेल्या राजकीय भूकंपाचा आनंद महाराष्ट्रातील भाजपला घ्यायचा असेल, तर गुढी पाडव्यापर्यंतच काय तर येणाऱ्या दिवाळीपर्यंत जरी घेतला तरी तो मध्यप्रदेशचाच घ्यावा लागेल. महाराष्ट्रात असा आनंद भाजपच्या नेत्यांना घेता येणार नाही. असेही मुंडे म्हणाले.

mumbai
धनंजय मुंडे
author img

By

Published : Mar 11, 2020, 12:10 PM IST

Updated : Mar 11, 2020, 12:22 PM IST

मुंबई - मध्यप्रदेश सारखा प्रयोग महाराष्ट्रात करण्यासाठी राज्यातील आणि केंद्रातील भाजपच्या नेत्यांना अनेक जन्म घ्यावे लागतील, असे विधान सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. ते विधीमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलत होते.

मुहूर्त शोधणं हे मुनगंटीवारांचं काम आहे - धनंजय मुंडे

रंगपंचमीच्या मुहूर्तावर ज्याप्रमाणे मध्यप्रदेशमध्ये भूकंप झाला तसा महाराष्ट्रातही गुढी पाडव्याला होईल, असे वक्तव्य मुनगंटीवार यांनी केले. यावर पत्रकारांनी विचारल्यावर असा मुहूर्त शोधणं हे मुनगंटीवारांचे काम आहे. असा टोला मुंडे यांनी मुनगंटीवार यांना लगावला आहे. मध्यप्रदेशमध्ये झालेल्या राजकीय भूकंपाचा आनंद महाराष्ट्रातील भाजपला घ्यायचा असेल, तर गुढी पाडव्यापर्यंतच काय तर येणाऱ्या दिवाळीपर्यंत जरी घेतला तरी तो मध्यप्रदेशचाच घ्यावा लागेल. महाराष्ट्रात असा आनंद भाजपच्या नेत्यांना घेता येणार नाही. असेही मुंडे म्हणाले.

हेही वाचा - मुंबईकरांनो घाबरू नका, मुंबईत कोरोनाचा एकही रुग्ण नाही

दरम्यान, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय दिव्यांगांची स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. ज्यावेळी संपूर्ण परिस्थिती पूर्व पदावर आल्यानंतर रद्द केलेल्या स्पर्धा सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये घेण्याचा निर्णय झाल्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. सामाजिक न्याय विभागाच्यावतिने 14 आणि 15 मार्च 2020 ला राज्यस्तरीय दिव्यांगांची स्पर्धा पुण्याच्या बालेवाडी येथे आयोजित करण्यात आली होती.

Last Updated : Mar 11, 2020, 12:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.