मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची थेट तुलना करणारे पुस्तक भाजपने प्रकाशित केले आहे. यावरुन मोठे वादंग निर्माण झाले आहे. सर्वच स्तरातून या पुस्तकावरुन टीका होत आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनीही भाजपवर निशाणा साधला आहे. छत्रपतींची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. हा अट्टहास करु पाहणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नसल्याचे मुंडे म्हणाले.
-
हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान मोदींची थेट तुलना करणारे पुस्तक प्रकाशित करून भाजपच्या नेत्यांनी मराठी जनाच्या भावना दुखावल्या आहेत. युगपुरुष छत्रपती शिवरायांची बरोबरी कोणीही करू शकत नाही, हा अट्टहास करू पाहणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. pic.twitter.com/vB7AjieBcI
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान मोदींची थेट तुलना करणारे पुस्तक प्रकाशित करून भाजपच्या नेत्यांनी मराठी जनाच्या भावना दुखावल्या आहेत. युगपुरुष छत्रपती शिवरायांची बरोबरी कोणीही करू शकत नाही, हा अट्टहास करू पाहणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. pic.twitter.com/vB7AjieBcI
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 12, 2020हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान मोदींची थेट तुलना करणारे पुस्तक प्रकाशित करून भाजपच्या नेत्यांनी मराठी जनाच्या भावना दुखावल्या आहेत. युगपुरुष छत्रपती शिवरायांची बरोबरी कोणीही करू शकत नाही, हा अट्टहास करू पाहणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. pic.twitter.com/vB7AjieBcI
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 12, 2020
'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' असे प्रकाशीत झालेल्या पुस्तकाचे नाव आहे. यावरुन भाजपसह नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान मोदींची तुलना करुनारे पुस्तक भाजपने प्रकाशीत केल्याने मराठी जनांच्या भावना दुखावल्याचे मुंडे म्हणाले.