मुंबई - भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना जुन्या चुका कळू लागल्या आहेत, त्यामुळे त्यांनी नव्या चुका करू नयेत, असा टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे. ते येथे माध्यमांशी बोलत होते.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून निवडणूक लढवणारे उमेदवार राजीव सातव दुपारी एक वाजता विधीमंडळात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. तर महाराष्ट्रातही मध्यप्रदेशप्रमाणे ज्योतीरादित्य सिंधिया तयार होऊन महाआघाडीचे सरकार कोसळेल, असे भाकित भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली होती. त्याला उत्तर देताना बाळासाहेब थोरात म्हणाले, मुंनगटीवार यांना जुन्या चुका आता कळू लागल्या आहेत. त्यामुळे त्यांनी असे वक्तव्य केले होते. म्हणून त्यांनी आता जुन्या चुकांचा बोध घेऊन नव्या चुका करू नये, असा टोलाही मुंनगटीवार यांना थोरातांनी लावला.
हेही वाचा - 'मला वगळल्याचे दुःख नाही; मात्र, खडसेंना उमेदवारी द्यायला हवी होती'