ETV Bharat / state

OBC Scholarship : ओबीसी विद्यार्थ्यांच्या परदेशातील शिक्षणासाठी 12 कोटी ८८ लाख मंजूर - अतुल सावे

OBC Scholarship : परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्य शासनाने दिवाळीत मोठा दिलासा दिला आहे. ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे १२ कोटी ८८ लाख शासनाने मंजूर केले (12 Crores 88 lakhs Approved Under OBC Scholarship) आहेत.

OBC Scholarship
ओबीसी शिष्यवृत्ती
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 13, 2023, 9:39 PM IST

Updated : Nov 13, 2023, 10:10 PM IST

मुंबई OBC Scholarship : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आणि तरुणांना नोकरी आणि शिक्षणामध्ये दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीनं सारथी आणि अण्णासाहेब पाटील मराठा आर्थिक विकास महामंडळ यांना भरघोस निधी देऊन मदत देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्या पाठोपाठ आता राज्य सरकारने ओबीसी समाजालाही दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. ओबीसी समाजातील परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 12 कोटी 88 लाख रुपये मंजूर केले असल्याची (12 Crores 88 lakhs Approved Under OBC Scholarship) माहिती, इतर मागासवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे (Minister Atul Save) यांनी दिली आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर मोठा दिलासा : ओबीसी समाजातील असंतोष मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर वाढत असताना, सरकारने आता परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही दिवाळीच्या मुहूर्तावर (Diwali) मोठा दिलासा दिला आहे. या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी राज्य सरकारनं 12 कोटी 88 लाख रुपये मंजूर केले आहेत. तसा शासन निर्णयही सरकारने नुकताच जारी केल्याचं मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी सांगितलं.

ओबीसी समाजातील 50 विद्यार्थ्यांची निवड : राज्य सरकारने प्रदेशातील शिष्यवृत्तीसाठी 2023-24 साठी ओबीसी समाजातील 50 विद्यार्थ्यांची निवड केली आहे. यामध्ये या वर्षाच्या बॅचमधील 32 तर मागील बॅचमधील दोन विद्यार्थ्यांसाठी 12 कोटी 88 लाख रुपये मंजूर केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. ओबीसी प्रवर्गातील गुणवंत आणि होतकरू मुला मुलींना परदेशात उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी या शिष्यवृत्तीचा निश्चितच फायदा होईल असा विश्वास अतुल सावे यांनी व्यक्त केला आहे.

कोणत्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश ? : या शिष्यवृत्ती अंतर्गत अमरावती विभागातील पाच विद्यार्थी, नागपूर विभागातील 13 विद्यार्थी, नाशिक विभागातील सात विद्यार्थी, औरंगाबाद विभागातील एक विद्यार्थी, पुणे विभागातील अठरा विद्यार्थी, तर मुंबई विभागातील सहा विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे. यासाठी इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे याचे संचालक यांना नियंत्रक अधिकारी तसेच संबंधित विभागाच्या प्रादेशिक उपसंचालकांना आहार आणि संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

हेही वाचा -

  1. Tanaji Sawant On Maratha Reservation : दोन वर्षात कोणीच आंदोलन केलं नाही, आताच आंदोलन का - आरोग्य मंत्री तानाजी सावंत
  2. Manoj Jarange Patil Z Plus Security : मनोज जरांगे पाटलांना 'झेड प्लस' सुरक्षा देण्याची मराठा समाजाची माणगी; नितेश राणेंचंही पत्र
  3. MLA Prakash Solanke : 'माझ्या घरावर हल्ला करणारे समाजकंटकच, मराठा समाज नाही'

Last Updated : Nov 13, 2023, 10:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.