ETV Bharat / state

'रेमडेसिवीरचे उत्पादन वाढवण्यासाठी राज्यसरकार सर्वतोपरी सहकार्य'

author img

By

Published : May 6, 2021, 7:16 PM IST

मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज (दि. 6 मे) देशात सर्वात जास्त रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन करणाऱ्या पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसी येथील 'कमला लाईफसायन्सेस लिमिलेड'या कंपनीला भेट देत कंपनीचे चेअरमन डाॅ. दिगंबर झवर व उत्पादन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

मंत्री अस्लम शेख
मंत्री अस्लम शेख

मुंबई - शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज (दि. 6 मे) देशात सर्वात जास्त रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन करणाऱ्या पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसी येथील 'कमला लाईफसायन्सेस लिमिलेड'या कंपनीला भेट देत कंपनीचे चेअरमन डाॅ. दिगंबर झवर व उत्पादन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

बोलताना मंत्री अस्लम शेख

कंपनीच्या वाढलेल्या क्षमतेनुसार महिन्याला 30 लाखपेक्षा जास्त रेमडेसिवीरचे उत्पादन करण्याची कंपनीची क्षमता आहे. कच्च्या मालाचा पुरवठा मुबलक प्रमाणात झाल्यास 50 लाखांपेक्षा जास्त रेमडेसिवीरचे उत्पादन कंपनी घेऊ शकते. देशात रेमडेसिवीरचे उत्पादन घेणाऱ्या कंपन्यांना कच्चा माल माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन दिल्यास त्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते.

राज्यात व देशात रेमडेसिवीरचा काळा बाजार मोठ्या प्रमाणावर होत आहे. रेमडेसिवीरच्या एका कुपीची किंमत फार-फार तर दोन हजार असायला हवी. मात्र, काळ्या बाजारात वीस हजार पेक्षा जास्त दराने याची विक्री होत आहे. रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी आगामी काळात राज्य सरकार कठोर पऊले उचलणार आहे.

हेही वाचा - मुंबई : नेस्कोत उभारले जाणार देशातील पहिले स्वतंत्र पीडियाट्रीक कोविड सेंटर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.