ETV Bharat / state

दिलासादायक..! कधीकाळी 'हॉटस्पॉट' असलेल्या भागातील कोरोनास्तांच्या संख्येत घट - Dharavi corona update

मुंबईत कोरोना नियंत्रणात येत असून कधीकाळी मुंबईतील कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या धारावी आणि दादरमध्ये आता कोरोनाग्रस्तांची संख्या घटत चालली आहे. आज (दि. 27 डिसें.) दादरमध्ये 7 तर धारावीत 3 रुग्ण आढळले आहेत. एक आकडी रुग्ण संख्या असल्याने ही दिलासादायक बाब मानली जात आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Dec 27, 2020, 7:47 PM IST

मुंबई - मुंबईत कोरोना नियंत्रणात येत असून कधीकाळी मुंबईतील कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या धारावी आणि दादरमध्ये आता कोरोनाग्रस्तांची संख्या घटत चालली आहे. यात सर्वात दिलासादायक बाब म्हणजे शुक्रवारी (दि. 25 डिसें.) धारावीत एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला नव्हता. तर शनिवारी (दि. 26 डिसें.) दादरमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा शून्य होता. पण, आज (दि. 27 डिसें.) दादरमध्ये 7 तर धारावीत 3 रुग्ण आढळले आहेत. एक आकडी रुग्ण संख्या असल्याने ही दिलासादायक बाब मानली जात आहे.

जी उत्तर दाट लोकवस्तीचा परिसर असल्याने वाढली होती भीती

जी उत्तर विभाग हा मोठा विभाग आहे. तर यात आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी, अशी ओळख असलेली धारावी आणि दादर-माहीमसारखा गजबजलेला, बाजारपेठांचा परिसर आहे. त्यामुळे या विभागात कोरोनाचे रुग्ण एप्रिल-मे महिन्यामध्ये मोठ्या संख्येने वाढू लागले. त्यामुळे मुंबई महापालिकेची धास्ती चांगलीच वाढली. त्यात काही दिवसांनी या परिसराला मुंबईतील कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून ओळखू जाऊ लागले. दाट लोकवस्तीच्या आणि गजबजलेल्या परिसरात कोरोना वाढला तर अडचणी वाढण्याची भीती होती. त्यामुळे पालिकेने येथे आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली.

अखेर प्रयत्न यशस्वी

धारावी आणि दादरमध्ये रुग्ण वाढू लागल्याने पालिके विविध उपाययोजना सुरू केल्या. ट्रेसिंग, टेस्ट, ट्रीटमेंटसह धारावी मॉडेल उभे केले. घरोघरी जाऊन लोकांची तपासणी केली. तर दादर परिसरातील विक्रेते, फेरीवाले, भाजी विक्रेते अशी सर्वांची टप्प्याटप्प्यात कोरोना चाचणी केली. अखेर या प्रयत्नांना यश मिळाले आणि आता जी उत्तर परिसर कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे.

रविवारी जी उत्तरमध्ये 14 रुग्ण

शुक्रवारी धारावीत शून्य आणि शनिवारी दादरमध्ये शून्य कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होते. ही दिलासादायक बाब मानली जात आहे. पण, आज रविवारी पुन्हा धारावी आणि दादरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. पण, ही संख्या एक आकडी असून ती कमी आहे हे विशेष. जी उत्तर विभागातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आज (27 डिसें.) धारावी 3, दादरमध्ये 7 तर माहीममध्ये 4 असे जी उत्तर मध्ये 14 रुग्ण आढळले आहेत.

हेही वाचा - कस्तुरबा रुग्णालयातील बेड वाढवण्याचा निर्णय, 220 नव्या बेडचा प्रस्ताव

हेही वाचा - अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 47लाखांची भरपाई देण्याचे 'बेस्ट'ला आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.