ETV Bharat / state

Milk Adulteration : पांढर्‍या दुधाचा काळाबाजार; गुन्हे शाखेच्या कारवाईत 1040 लिटर भेसळयुक्त दूध जप्त - Milk Adulteration

मुंबईत पांढर्‍या दुधाचा काळाबाजार समोर आला आहे. समतानगर पोलीस हद्दीत भेसळयुक्त दूधाचा कारखाना सुरू असल्याची माहिती समोर येत ( Milk Adulteration in Samtanagar police area ) आहे. 1040 लिटर भेसळयुक्त दूध जप्त करत गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Milk Adulteration
पांढर्‍या दुधाचा काळाबाजार
author img

By

Published : Jan 11, 2023, 4:03 PM IST

मुंबई : मुंबई गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे शाखेने पांढऱ्या दुधाच्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश केला आहे. समतानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोईसर परिसरातील बिहारी टेकडी सोसायटीत एका घरात दूधाची भेसळ करणाऱ्यांचा काळाबादार सुरू( Milk Adulteration in Samtanagar police area ) होता. या कारखान्यातून 1040 लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले ( 1040 liters of adulterated milk seized ) आहे. या भेसळीच्या व्यवसायातील 4 पुरुष आणि 1 महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

मोठ्या हॉटेल्स, सोसायट्यांना दुधाचा पुरवठा : हे भेसळयुक्त दूध गोकुळ आणि अमूल कंपनीच्या पॅकिंगमध्ये मोठ्या हॉटेल्स आणि मोठ्या सोसायट्यांना पुरवले जात होते. गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषध विभागाच्या पथकाने हा छापा टाकला. समता नगर पोलिसांना त्यांच्या हद्दीत भेसळयुक्त दुधाचा कारखाना खुलेआम सुरू असल्याची माहितीही नव्हती. या कारवाईनंतर समता नगर पोलीस खडबडून जागे झाले आहेत. आधी आरोपी गोकुळ आणि अमूल कंपनीच्या ब्रँडेड दुधाच्या पिशव्या खरेदी ( Milk packed in Gokul and Amul packet ) करायचे. दूध पिशवीतून बाहेर काढल्यानंतर त्यात थोडे पाणी आणि रसायने मिसळून दूध घट्ट करून नंतर पॅकिंग करून पुन्हा बाजारात विकायचे. ९ जानेवारी रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास पोयसर परिसरातील एका सोसायटीत भेसळयुक्त दुधाचा कारखाना सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिस आयुक्तालयाला मिळाली होती.

रसायने मिसळून दूधाची बाजारात विक्री : कंट्रोलकडून तक्रार मिळाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे एपीआय रुपेश दरेकर आणि अन्न सुरक्षा अधिकारी तुषार यांच्यासह पथकाने धाड टाकली. घटनास्थळी आढळलेले हजारो लिटर भेसळयुक्त दूध आणि पॅकिंग मशीन, टब, मेणबत्त्या व इतर साहित्य जप्त केल्या. कारखान्यात भेसळयुक्त दूध, कारखाना चालवणाऱ्या ५ जणांना अटक केली ज्यात एका महिलेचाही समावेश आहे. गुन्हे शाखेने सुमारे 1 हजार 40 लिटर भेसळयुक्त दूध जप्त केले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विराय रोशैया (49), श्रीनिवास नरसिंग वडला कोंड (38), नरेश मरय्या जडला (29) यांचा समावेश आहे. अंजय्या गोपाळू बोडुपल्ली (४३) रामा सत्यनारायण गज्जी (३०) यांना कलम ४२०,२७२,२७३,४८२,४८५,३,४ सह कलम १८,२६,२७,३१ अन्वये अटक करण्यात आली आहे. कारवाईनंतर पुढील तपास समता नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.