ETV Bharat / state

मिलिंद देवरांनी काँग्रेसला दाखवला 'हात'; नाना पटोलेंची सरकारवर टीका - मुंबई काँग्रेस अध्यक्षा

Milind Deora Quits Congress : काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा पक्षाचा राजीनामा दिल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळं काँग्रेसला दक्षिण मुंबईत मोठा फटका बसणार असल्याची चर्चा करण्यात येत आहे. मात्र मिलिंद देवरांच्या राजीनाम्यानंतर नाना पटोले यांनी सरकारवर टीका केली आहे.

Milind Deora Quits Congress
संपादित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 14, 2024, 12:10 PM IST

Updated : Jan 14, 2024, 1:29 PM IST

मुंबई Milind Deora Quits Congress : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता काँग्रेस पक्षाला खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्षातून बाहेर पडल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. त्यावर काँग्रेस पक्षाकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र सरकारवर टीका केली आहे. असंवैधानिक सरकारचा शेवट होणार असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे.

वर्षा गायकवाड

विकासाच्या मार्गावर जातोय : मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आपण राजीनामा दिल्याची माहिती आपल्या सोशल मीडिया वरून दिली. थोड्या वेळापूर्वी माध्यमांनी त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, "मी विकासाच्या मार्गावर जात आहे " असं मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे.

  • आजपासून सुरु होणा-या राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष घाबरले आहेत. त्यामुळेच यात्रेपासून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी ED, CBI, IT यासारख्या केंद्रीय संस्थांची भिती दाखवून आमच्या काही सहता-यांना आपल्यासोबत घेत आहेत.

    काँग्रेस फुटणार अशा…

    — Nana Patole (@NANA_PATOLE) January 14, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

असंवैधानिक सरकारचाही शेवट होणार - नाना पटोले : "आजपासून सुरु होणाऱ्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला भाजपा आणि त्यांचे सहकारी पक्ष घाबरले आहेत. त्यामुळंच यात्रेपासून दुसरीकडं लक्ष वळवण्यासाठी ईडी, सीबीआय, आयकर यासारख्या केंद्रीय संस्थांची भिती दाखवून आमच्या काही सहकाऱ्यांना आपल्यासोबत घेत आहेत. काँग्रेस फुटणार अशा अफवा उठवणारे भाजपा आणि त्यांचे फुटीर सहकारी दोनवेळा पराभूत झालेल्या उमेदवाराला सोबत घेत आहेत. त्यावरुन भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभावरून दुसरीकडं लक्ष वळवण्याचा प्रयत्न करतायेत, पण तो यशस्वी होणार नाही. या यात्रेची समाप्ती मुंबईतच होणार असून यात्रेच्या समाप्ती सोबतच असंवैधानिक भाजपा, शिंदे, अजित पवार सरकारचाही शेवटही होणार आहे."

राजीनाम्याचा फेरविचार करा - वर्षा गायकवाड : " सकाळी मिलिंद देवरा यांचं मी ट्विट बघितलं, काँग्रेस पक्षाचा राजीनामा त्यांनी दिला. देवरा परिवार आणि काँग्रेस परिवार एक वेगळं समीकरण आहे. आपण घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा, असं आवाहन मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केला आहे. आपल्या सोबत संवाद करण्याचा प्रयत्न केला, मी असेल किंवा प्रभारी असेल, आमचा हाच प्रयत्न राहिला की काँग्रेस परिवार एकत्र राहिला पाहिजे. आज भारत जोडो न्याय यात्रा सुरू होत आहे आणि अशा वेळी त्यांनी घेतलेला हा निर्णय मनाला खेद लावणारा आहे."

हेही वाचा :

  • आमचे सहकारी मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्देवी आहे. राजीनामा देण्यासाठी त्यांनी आज भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभाचा दिवस निवडून यात्रेला एकप्रकारे अपशकून करण्याच्या अयशस्वी प्रयत्न केला आहे.

    देशातील सर्वसामान्य, गोरगरीब, शोषीत,…

    — Balasaheb Thorat (@bb_thorat) January 14, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  1. माजी खासदार मिलिंद देवरा काँग्रेसचा 'हात' सोडणार? 'या' पक्षाकडे मागणार 'साथ'?
  2. काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक; जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर नाना पटोलेंचं मोठं विधान
  3. उच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर तरी निवडणूक आयोगानं सुधारलं पाहिजे - नाना पटोले

Last Updated : Jan 14, 2024, 1:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.