ETV Bharat / state

वांद्रे स्थानकात उत्तर भारतीयांची तुफान गर्दी, पोलिसांचा लाठीमार

author img

By

Published : May 19, 2020, 3:19 PM IST

Updated : May 19, 2020, 4:02 PM IST

कोरोनाचा देशातील वाढता संसर्ग पाहून केंद्र सरकारने चौथ्यांदा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या लॉकडाऊनच्या काळात मुंबईत अडकलेल्या मजुरांनी आपापल्या गावी जाण्याासाठी वांद्रे परिसरातील रेल्वे स्टेशन परिसरात मोठी गर्दी केली. पोलिसांनी गर्दी करू नका, असे वारंवार आवाहन केले होते. मात्र काही केल्या गर्दी हटत नसल्याने पोलिसांना नाईलाजास्तवर गर्दीवर लाठीचार्ज करावा लागला.

migrants gather at Bandra railway station after rumours of special trains
वांद्रे स्थानकात पुन्हा एकदा तुफान गर्दी, पश्चिम द्रुतगती मार्गावर देखील सकाळी लांबच लांब गाड्यांचा रांगा

मुंबई - कोरोनाचा देशातील वाढता संसर्ग पाहून केंद्र सरकारने चौथ्यांदा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या लॉकडाऊनच्या काळात मुंबईत अडकलेल्या मजुरांनी आपापल्या गावी जाण्यासाठी वांद्रे रेल्वे स्टेशन परिसरात मोठी गर्दी केली. पोलिसांकडून गर्दी करू नका, असे वारंवार आवाहन केले होते. मात्र काही केल्या गर्दी हटत नसल्याचे पाहून पोलिसांना नाईलाजास्तवर लाठीचार्ज करावा लागला. दरम्यान, याठिकाणी जमलेले जास्तीत जास्त लोक कामानिमित्त उत्तर प्रदेश आणि बिहार येथून मुंबईत आलेले आहेत.

'वांद्रे टर्मिनस येथून ट्रेन सुरू होणार' या अफवेने हजारो परप्रांतीय लोक या स्थानकात जमले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. परंतु परराज्यात अडकलेल्या कामगारांना त्यांच्या राज्यात सोडण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी केंद्र शासनाने श्रमिक रेल्वे सुरू केल्या. राज्यातील कामगारांनी परराज्यातील कामगारांनी आपली नोंदणी करून त्यांच्या गावी जावे, असे आव्हान सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास परप्रांतीय कामगारांनी वांद्रे स्थानक परिसरात गर्दी केली.

वांद्रे स्टेशन परिसरात परप्रांतिय मजूरांनी केलेली गर्दी...

पश्चिम मार्गावर राहणारे परप्रांतीय मजूर काही नोंदणी केलेले, व काही विनानोंदणी करता गाडी पकडण्यासाठी वांद्रे स्थानकात हजारोच्या संख्येने जमले होते. ज्यांची नोंदणी झाली आहे. त्यांच्यासाठी आज वांद्रे टर्मिनल येथून गोरखपूर आणि बोकोराला गाड्या सुटणार होत्या. त्यामुळे गर्दी होणे साहजिकच आहे. पण आपल्याला गावी जायला मिळेल, या आशेने विनानोंदणी केलेले परप्रांतीयही त्या ठिकाणी आले होते. वांद्रे टर्मिनस येथून 1200 प्रवाशांना त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

अफवांमुळे झाली गर्दी -

उत्तर प्रदेश, बिहार येथे एक्सप्रेस गाड्या सुटणार अशी अफवा पसरल्याने, परप्रांतीयाची मोठी गर्दी झाली. दरम्यान, मागील महिन्यात वांद्रे येथे परप्रांतीयांनी मोठी गर्दी केली होती. त्यावेळीही पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला होता.

फिजिकल डिस्टन्सिंग ठेऊन नोंदणी केलेल्या मजुरांना स्थानकात प्रवेश

पोलिसांनी, नोंदणी केलेल्या परराज्यातील कामगारांनाच स्टेशनमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग ठेवत प्रवेश दिला आणि बाकीच्यांना परत पाठवले. या प्रकरणात पोलिसांनी काही मजुरांवर कारवाई देखील केली.

वांद्रे टर्मिनस येथे गर्दीचा प्रभाव पश्चिम दुर्गतीमार्गावर देखील दिसला. कारण पश्चिम मार्गावर राहणारे सर्व परराज्यातील कामगार याच मार्गाने, मिळेल त्या खासगी वाहनाने वांद्रे स्थानकात पोहोचण्यासाठी पश्चिम द्रुतगती मार्गावरून आले होते. तसेच राज्यात लॉकडाऊन चौथा आजपासून सुरू झाल्याने नागरिकांनी अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावर देखील सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.

Last Updated : May 19, 2020, 4:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.