मुंबई - शहर आणि उपनगर येथील परराज्यातील स्तलांतरीत मजुरांना पोलिसांच्या माध्यमातून घरी पाठवण्यासाठी सुरुवात झाली आहे. मात्र, मुंबईच्या विलेपार्ले पोलीस स्टेशनच्या आवारात आज (बुधवार) परप्रांतीय मजुरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा... लॉकडाऊन : पालघरमधील नवदाम्पत्य लग्नाच्या बेडीत 'लॉक,' मुख्यमंत्री निधीत 10 हजारांची मदत
एअरपोर्ट परिसरात हे मजूर जमल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पहायला मिळाले. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील या मजुरांना विलेपार्ले पोलिसांच्या माध्यमातून गावी जायचे होते. परंतु, आज गाडी जाणार नसल्यामुळे मोठ्या संख्येने जमलेल्या या परप्रांतीय मजुरांची निराशा झाली.
या मजुरांच्या माहितीनुसार काल (मंगळवार) विलेपार्ले पोलिसांनी पंधराशे मजुरांना येथून पाठवले होते. त्यामुळे पोलिसांनी आम्हालाही उत्तर प्रदेश गोरखपूर उत्तर पाठवा, अशी मागणी परप्रांतीय मजुरांनी केली.