कोलकात्यात तृणमूल-भाजप कार्यकर्ते भिडले.. अमित शाहांच्या रॅलीत दगडफेक व जाळपोळ
कोलकाता - भाजप व तृणमूल काँग्रेस यांच्यात संघर्ष तीव्र झाल्याचे दिसत आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या कोलकाता येथील रोड शो दरम्यान जाळपोळीच्या घटना घडल्या. या राड्यामुळे रोड शो थांबवण्यात आला.
सविस्तर वृत्त
लोहगाव येथील वायुदलाच्या शाळेत आढळली बॉम्बसदृश वस्तू
पुणे - लोहगाव येथील भारतीय वायुदलाच्या शाळेच्या प्रांगणात मंगळवारी बॉम्बसदृश वस्तू आढळून आली. त्यानंतर वायुदल आणि पुणे पोलिसांच्या पथकाने ही वस्तू परीक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठवली आहे. ही बॉम्बसदृश वस्तू तेथे कोणी ठेवली याचा शोध पुणे पोलिसांनी सुरू केला आहे.
सविस्तर वृत्त
दुष्काळी परिस्थितीत केलेल्या उपाययोजनेचा अहवाल सादर करा; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश
मुंबई - राज्य सरकारकडून दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी कुठल्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्या उपाययोजनाचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र आपत्कालीन परिस्थिती नियोजन समितीची नेमणूक करण्यात यावी, या मागणीसाठी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने निर्णय दिला आहे.
सविस्तर वृत्त
अमित शाहांच्या रॅलीवरील हल्ला ही लोकशाहीची हत्या - मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या पक्षाचा पराभव होईल म्हणून घाबरल्या आहेत. त्यामुळेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी अमित शाह यांच्या रॅलीवर हल्ला केला. हा हल्ला म्हणजे लोकशाहीची हत्या आहे, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
सविस्तर वृत्त
नववधुला सरप्राईज.. विवाह सोहळ्यानंतर हेलिकॉप्टरमधून केली पाठवणी
अहमदनगर- लग्न सोहळ्यात हौस करण्यासाठी वेगवेगळे फंडे अवलंबले जात आहेत. राहाता येथील साकुरी येथे पार पडलेल्या एका विवाह सोहळ्यात नववधुची पाठवणी थेट हेलिकॉप्टर मधुन केली गेली. नववधुला सरप्राईज म्हणुन माहेरच्या मंडळींनी हे आयोजन केल होते. माहेर साकुरी असलेल्या अंजलीला साकुरी ते शिरूर तालुक्यातील धानोरे अशी हवाईसफर घडवत कुटुंबीयांनी सुखद धक्का दिला.
सविस्तर वृत्त