ETV Bharat / state

Political Reservation Demand : आम्हाला राजकीय आरक्षण द्या; महिला सरपंचांची मागणी - टाटा मॅरेथॉन

18 व्या टाटा मॅरेथॉन मध्ये ड्रीम रन या प्रकारात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तब्बल वीस महिला सरपंच सहभागी झाल्या होत्या. गावांच्या विकासात आता महिला नेतृत्वही आपल्या परिने मोलाचे योगदान देत आहे. हेच महिला नेतृत्व आता लोकसभा आणि विधानसभेत देखील आम्हाला राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी मुंबईत दाखल झाल्या होत्या.

Political reservation demand
महिला सरपंचांची मागणी
author img

By

Published : Jan 15, 2023, 7:33 PM IST

Updated : Jan 15, 2023, 8:03 PM IST

विधानसभा, लोकसभेत आरक्षण हवे- महिला सरपंचांची मागणी

मुंबई : या महिलांची नेमकी मागणी काय आहे? त्या कोणत्या कारणाने मुंबईच्या टाटा मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्यात? हे जाणून घेण्यासाठी आम्ही काही महिलांशी संवाद साधला. यावेळी ईटीव्हीशी बोलताना सरपंच रत्नमाला वैद्य म्हणाल्या की, 'ग्रामपंचायतींच्या कारभाराचा डोलारा आम्ही आता यशस्वीरीत्या आपल्या खांद्यावर घेऊ लागल्या आहोत. स्थानिक विकासकामे, गरजा व निधीचा पारदर्शी उपयोग, या सर्व कामांमध्ये एक गावचा प्रमुख म्हणून आमचं काय कर्तव्य आहे हे आम्ही शिकलोय. आणि त्यामुळेच सुशासनाद्वारे महिला आणि गावाच्या सर्वांगीण विकासावर आमचा नेहमीच भर असतो.'

विधानसभा, लोकसभेत आरक्षण हवे : पुढे बोलताना सरपंच वैद्य म्हणाल्या की, 'महाराष्ट्रात 73 व्या घटनादुरुस्तीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींबरोबरच महिलांना 50 टक्के आरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. नावीन्यपूर्ण उपक्रमांचा स्वीकार करण्यात किंवा त्या आत्मसात करण्यात महिला नेहमीच तत्परता दाखवितात. त्यांना फक्त प्रोत्साहनाची गरज असते. आरक्षणामुळे आम्ही मागची काही वर्ष आमच्या गावचा डोलारा यशस्वीरित्या सांभाळतोय. मात्र, आम्हाला वाटतं फक्त ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येच नाही तर आता लोकसभा आणि विधानसभेत देखील महिलांना राजकीय आरक्षण मिळायला हवे.

हेही वाचा : गावाला कोरोनापासून दूर ठेवण्यात महिला सरपंच यशस्वी राबविले विविध उपक्रम

आरएससीडी, ईशादने केले स्वप्न पूर्ण : या सर्व महिलांना एकत्र केले ते आरएससीडी आणि ईशाद या संस्थेने. ग्राम विकास प्रशिक्षण आणि महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी झटणारी आरएससीडी आणि पायाभूत लोकशाही सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणारी ईशाद या स्वयंसेवी संस्थांच्या प्रोत्साहनातून महिला सरपंच आपले म्हणणे सरकार आणि जनतेसमोर ठेवण्यासाठी या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्या होत्या.

गावच्या कारभारी, मोठी जबाबदारी : 18 व्या टाटा मॅरेथॉन मध्ये ड्रीम रन या प्रकारात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तब्बल वीस महिला सरपंच सहभागी झाल्या होत्या. ग्रामपंचायतींमधील महिला नेतृत्व देशाच्या आर्थिक राजधानीत आणि राज्याच्या राजधानीत गाव खेड्याच्या विकासाचे स्वप्न घेऊन धावताना मुंबईकरांनी पाहिले. मुंबई मॅरेथॉनच्या दृष्टीने ही अद्‌भूत 'ड्रीम रन' ठरली. गावांच्या विकासात आता महिला नेतृत्वही आपल्या परिने मोलाचे योगदान देत आहे. हेच महिला नेतृत्व आता लोकसभा आणि विधानसभेत देखील आम्हाला राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी मुंबईत दाखल झाल्या होत्या.

हेही वाचा : शेतकऱ्यांच्या मुलींची मुंबई मॅरेथॉनमध्ये बाजी; दुसरा, तिसरा आणि पाचव्या क्रमांकाने मिळवला विजय

Last Updated : Jan 15, 2023, 8:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.