मुंबई - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (शनिवारी) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला (सीएसएमटी) भेट दिली. यावेळी त्यांनी गर्दी नियंत्रणाबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. जगाभरासह राज्यातही कोरोना विषाणूचा वाढत्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी ही भेट दिली.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसारामुळे राज्यभरात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरी भागातून लोक ग्रामीण भागाकडे निघाले आहेत. विशेषत: परप्रांतीय आपापल्या राज्यांमध्ये जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेल्वे स्थानकावर गर्दी करत आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी सीएसएमटी रेल्वे स्थानकाला भेट दिली. यावेळी त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच प्लॅटफॉर्मवरही जाऊन गर्दीची पाहणी केली. रेल्वेची वाट पाहत असलेल्या प्रवाशांना विलगीकरण करून ठराविक अंतराने प्लॅटफॉर्मवर उभे करावे किंवा जास्तीच्या गाड्या पाठवून प्रवाशांना रवाना करावे, अशा पर्यायांवर यावेळी चर्चा झाली.
हेही वाचा - CORONA VIRUS : 23 मार्च रोजी होणारा दहावीचा पेपर रद्द, नवी तारीख 31 मार्चनंतर