मुंबई- सीईटी एलएलबीचे निकाल हे scorecard.mhexam.com या वेबसाईटवर पाहता येतात. एमएच सीईटी लॉमध्ये खुल्या गटातील विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी 45 टक्के तर आरक्षण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 40 टक्के गुण आवश्यक आहेत. राज्याती 140 हून अधिक लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी या परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक आहेत. प्रत्येक कॉलेजकडून प्रवेशासाठी विविध कटऑफ जाहीर करते.
विद्यार्थ्यांना थेट एलएलबी प्रवेश घेता येत नाही. त्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. 20 एप्रिल 2023 रोजी MH CET 5-वर्षीय लॉसाठी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना mahacet.org या अधिकृत साइटवर त्यांचे निकाल पाहता येणार आहेत. एमएचसीईटी 5 वर्षांची LLB परीक्षा महाराष्ट्रातील 140 पेक्षा जास्त लॉ कॉलेजमधील प्रवेशासाठी अनिवार्य आहे. मात्र, प्रत्येक सहभागी कॉलेजचे कटऑफ वेगळे असणार आहेत.
असे मिळणार प्रवेश- उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी आणि जागा वाटप हे प्रवेश परीक्षेतील त्यांचे गुण, पसंतीचे महाविद्यालय आणि महाविद्यालयातील जागांची उपलब्धता, उमेदवारांची श्रेणी, पात्रता परीक्षेतील गुण यावर असणार आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला, एमएच सेट सेलने 20 एप्रिल 2023 रोजी MAH CET 5-वर्षीय LLB प्रवेश परीक्षा राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेतली होती. प्रश्नपत्रिकेत कायदेशीर योग्यता आणि कायदेशीर तर्क, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी, तार्किक आणि विश्लेषणात्मक तर्क, इंग्रजी आणि मूलभूत गणित असे विविध विषय होते.
एमएएच सीईटी एलएलबी निकाल 2023 कसा पाहायचा?
- अधिकृत वेबसाइट- cetcell.mahacet.org ला भेट द्या.
- CET LLB स्कोअरकार्ड लिंकवर क्लिक करा.
- उमेदवारांनी ओळखपत्रांसह लॉग इन करणे आवश्यक आहे.
- निकाल 2023 PDF स्वरूपात स्क्रीनवर दिसेल.
- CET निकाल PDF डाउनलोड करून प्रिंटआउट घ्या.
हेही वाचा-
- म्हाडातून सर्वसामान्यांनाही मिळणार आलिशान घरांचीही लॉटरी, जाणून घ्या किमती
- Congress Suspend To Ashish Deshmukh : बंडखोर नेते आशिष देशमुख यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी; देवेंद्र फडणवीसांनी घेतली होती भेट
- Maharashtra Board Result 2023 : विद्यार्थ्यांनो ऐकलं का! बारावीच्या निकालाची तारीख झाली जाहीर; ‘या’ तारखेला लागणार Result