ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट: जनता कर्फ्युसाठी उद्या मुंबईत मेट्रो १ सेवा बंद

गतीमान सेवा मिळत असल्यामुळे मेट्रो १ मध्ये प्रवाशांची तुडुंब गर्दी असते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी थोडी फार कमी झाली आहे. पण, कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी रविवारी मेट्रो १ बंद करण्याचा निर्णय एमएमओपीएलने घेतला आहे.

mumbai metro
मुंबई मेट्रो
author img

By

Published : Mar 21, 2020, 5:57 PM IST

मुंबई- कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून खबरदारीचा उपाय म्हणून रविवारी जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रो १ प्रा. लिमिटेड (एमएमओपीएल) ने वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १ सेवा बंद केली आहे. यामुळे उद्या जनता कर्फ्यूला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

गतीमान सेवा मिळत असल्यामुळे मेट्रो १ मध्ये प्रवाशांची तुडुंब गर्दी असते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी थोडी फार कमी झाली आहे. पण, कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी रविवारी मेट्रो १ बंद करण्याचा निर्णय एमएमओपीएलने घेतला आहे. या आधी एमएमआरडीएने देखील शहरात मोनो सेवा बंद केली होती आणि आता मेट्रो १ सेवा बंद करण्यात येत असल्याने जनता कर्फ्युला चांगला प्रतिसाद मिळेल असे म्हटले जात आहे.

हेही वाचा- कोरोनाच्या धास्तीने मुंबईच्या लोकलमधील गर्दी ओसरली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.