ETV Bharat / state

मुंबईकरांसाठी खुशखबर! 'या' दोन मार्गांवर लवकरच धावणार मेट्रो - मुंबई मेट्रो 7 मार्ग

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईतील मेट्रोचे 2 मार्ग मेट्रो ७ आणि मेट्रो २ अ हे पुढील ३ ते ५ महिन्यात म्हणजेच डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान प्रवासी वाहतुकीकरता सुरू होणार आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने याची माहिती दिली आहे.

Metro
Metro
author img

By

Published : Sep 30, 2021, 11:14 AM IST

मुंबई : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईतील मेट्रोचे काम बघून मेट्रो सेवा कधी सुरू होणार? असा प्रश्न प्रत्येक मुंबईकराला पडतो. मात्र, आता मुंबईतील मेट्रोचे 2 मार्ग मेट्रो ७ आणि मेट्रो २ अ हे पुढील ३ ते ५ महिन्यात म्हणजेच डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान प्रवासी वाहतुकीकरता सुरू होणार असल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने जाहीर केलं आहे.

मुंबई मेट्रो 7 व मेट्रो 2 या मेट्रो मार्गांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दोन्ही मार्गांवर मेट्रोच्या चाचण्या विविध पातळीवर अंतिम टप्प्यात आहेत. मेट्रो स्थानकांची कामेही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.

मेट्रो 7 मार्ग कसा असणार?

पश्चिम उपनगरातील अंधेरी हा भाग अत्यंत गजबजलेला परिसर. या ठिकाणी वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न आहे. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेट्रो सेवा सोयीस्कर ठरणार आहे. मेट्रो ७ रेड लाईन हा मार्ग अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व असा एकूण १६.४७५ किलोमीटर लांबीचा आहे. या मेट्रो मार्गावर एकूण १३ मेट्रो स्थानके आहेत.

मेट्रो २ अ हा मार्ग

दोन महिन्यात मेट्रो सेवा सुरू होणार आहे. दोन मार्ग सुरु होणारे यापैकी मेट्रो २ अ येलो लाईन हा मार्ग डीएन नगर ते दहिसर हा मार्ग आहे. एकूण १८.५८९ किलोमीटर लांबीचा असणार आहे. या मेट्रो मार्गावर एकूण १७ स्थानके आहेत. या मेट्रो मार्गाचा देखील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मोठा फायदा होणार आहे. कारण लिंक रोडला जोडणारा हा मार्ग असणार आहे.

या दोन्ही मेट्रो मार्गाचे भुमिपूजन ऑक्टोबर २०१५ ला झाले होते. तर प्रत्यक्ष कामाला सुरुवात ही २०१६ मध्ये झाली. अखेर पाच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर प्रत्यक्षात मेट्रो सेवा काही महिन्यातच मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे.

हेही वाचा - एकरकमी एफआरपीसाठी भाजपा किसान मोर्चा आक्रमक, पुण्यात साखर संकुलाबाहेर धरणे आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.