ETV Bharat / state

मुंबईकरांसाठी गुडन्यूज..! मे २०२१ पासून मेट्रो ७ आणि मेट्रो २ अ होणार सुरू

मजूर नसल्याने काहीकाळ काम बंद होते. त्यामुळे नक्कीच प्रकल्पास विलंब होणार असल्याचे म्हटले जात आहे. पण, एमएमआरडीएने मात्र आपल्या प्रकल्पावर तितकासा परिणाम झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. उलट सर्व प्रकल्पांच्या कामांनी वेग घेतल्याची माहिती एमएमआरडीए आयुक्त आर.ए राजीव यांनी आज दिली.

मेट्रो
मेट्रो
author img

By

Published : Sep 10, 2020, 5:21 PM IST

Updated : Sep 10, 2020, 5:29 PM IST

मुंबई- कोरोना काळात मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्प रखडल्याने अनेक प्रकल्पांची डेडलाइन चुकणार असे म्हटले जात आहे. असे असताना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्या मेट्रो २ अ (दहीसर ते डीएन नगर) आणि मेट्रो ७ (दहीसर पूर्व ते अंधेरी पूर्व) मार्गाचाही मुहूर्त चुकला आहे. पण हा मुहूर्त केवळ ६ महिने पुढे गेल्याचे म्हणत एमएमआरडीएने हे दोन्ही मार्ग मे २०२१ मध्ये मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे येणाऱ्या वर्षात मुंबईकरांचा प्रवास आणखी सुकर आणि वेगवान, तसेच गारेगार होणार आहे.

माहिती देताना एमएमआरडीएचे आयुक्त आर.ए राजीव

मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी एमएमआरडीएने मेट्रोचे जाळे विणण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार मेट्रो १ याआधीच सेवेत दाखल झाली आहे. तर आता अनेक मेट्रो मार्गाचे काम वेगात सुरू आहे. दरम्यान, कोरोना लॉकडाऊनमुळे या कामाला ब्रेक लागला आहे. मजूर नसल्याने आणि काही काळ काम बंद होते, त्यामुळे नक्कीच प्रकल्पास विलंब होणार असल्याचे म्हटले जात आहे. पण, एमएमआरडीएने मात्र आपल्या प्रकल्पावर तितकासा परिणाम झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. उलट सर्व प्रकल्पांच्या कामांनी वेग घेतल्याची माहिती आयुक्त आर.ए राजीव यांनी आज दिली.

मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन्ही मार्गासाठी एमएमआरडीएने डिसेंबर २०२० ची डेडलाईन दिली होती. पण, आता ही डेडलाईन काहीशी पुढे गेली आहे. त्यानुसार आता मे २०२१ मध्ये हे दोन्ही मेट्रो मार्ग सेवेत दाखल होणार असल्याची घोषणा राजीव यांनी केली आहे. ही फार मोठी बाब मानली जात आहे. कारण लोकल, बेस्टच्या जीवघेण्या प्रवासातून नागरिकांची सुटका होणार आहे. दहीसर ते अंधेरी पर्यंतचा प्रवास मेट्रोमुळे सुकर होणार आहे. १४ जानेवारीपासून या मार्गावर ट्रायल रनसाठी ११ मेट्रो गाड्या मुंबईत आणण्यात येणार आहेत. त्यातील पहिली गाडी ऑगस्टमध्ये येणार होती, पण आता ही गाडी डिसेंबरमध्ये येईल. तर, उर्वरित १० गाड्या एप्रिलमध्ये मुंबईत येतील. त्यानुसार १४ जानेवारीला मेट्रोची ट्रायल रन सुरू होईल आणि मे २०२१ ला मेट्रो धावेल, असे राजीव यांनी सांगितले आहे.

हेही वाचा- सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार विकून शिवसेना आता 'सोनिया सेना' झालीय - कंगना

Last Updated : Sep 10, 2020, 5:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.