ETV Bharat / state

Megablock : 29 ऑक्टोबरला मुंबईकरांना 'मेगाब्लॉक'चा फटका; जाणून घ्या वेळापत्रक - ट्रान्स हार्बर उपनगरीय रेल्वे मार्गावरच मेगाब्लॉक

Megablock : 29 ऑक्टोबर रोजी रविवारी केवळ ट्रान्स हार्बर उपनगरीय रेल्वे मार्गावरच मेगाब्लॉक केला जाणार आहे.

Megablock
Megablock
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 27, 2023, 11:00 PM IST

मुंबई Megablock : या रविवारी मध्य रेल्वेकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 29 ऑक्टोबर रोजी रविवारी केवळ ट्रान्स हार्बर उपनगरीय रेल्वे मार्गावरच मेगाब्लॉक केला जाणार आहे. देखभाल दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक केला जाणार आहे. मात्र मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे मार्गावर कोणताही मेगाब्लॉक नसेल.

ट्रान्सफर मार्गावर मेगाब्लॉक : दर रविवारी देखभाल दुरुस्ती अभियांत्रिकेच्या कामासाठी तीनही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक आयोजित केला जातो. मात्र या रविवारी 29 ऑक्टोबर 2023 या दिवशी मध्य रेल्वे मार्ग, हार्बर रेल्वे मार्ग या ठिकाणी कोणताही मेगाब्लॉक नसेल. मात्र ट्रान्सफर रेल्वे मार्ग अर्थात ठाणे ते वाशी, ठाणे ते नेरूळ अप-डाऊन या ट्रान्सफर मार्गावर मात्र मेगाब्लॉक असणार आहे.

दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक : मेगा ब्लॉक हा ट्रान्स रेल्वे मार्गावर केला जाणार आहे. ट्रान्स हार्बर रेल्वे मार्ग म्हणजेच ठाणे ते वाशी ठाणे ते नेरूळ डाऊन आणि अशा दोन्ही मार्गावर हा मेगाब्लॉक असेल. या मेगाब्लॉकचा कालावधी सकाळी 11:10 पासून ते दुपारी चार वाजून दहा मिनिटे इतका काळ चालणार आहे. या काळामध्ये अभियांत्रिकी यांत्रिकी काम केले जाणार आहेत. त्यामुळं वाशी ते ठाणे नेरूळ ते ठाणे यामध्ये रेल्वे सेवा पाच तास पूर्णतः बंद राहणार आहेत. त्यामुळं प्रवाशांनी याबाबत प्रवास करण्याआधी वेळापत्रक पाहून नियोजन करायला हवं.

मार्गावरील सेवा रद्द : ठाणेहुन वाशी ,नेरूळ, पनवेल साठी सकाळी साडेदहा ते सायंकाळी चार वाजून सात मिनिटापर्यंत मेगा ब्लॉक असेल तर वाशी नेरूळ पनवेल येथून टाळण्यासाठी सकाळी 10:25 पासून ते दुपारी चार वाजून नऊ मिनिटापर्यंत दोन्ही अशा मार्गावरील सेवा रद्द राहतील. यासंदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे यांनी सर्व प्रवाशांना विनंती केली आहे, "की ट्रान्सफर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक आहे. त्यामुळं वेळापत्रक पाहूनच सर्वांनी प्रवास करावा, त्याबद्दल रेल्वे प्रशासन दिलगिरी व्यक्त करत आहेत."

हेही वाचा -

  1. Gokhale Flyover: अंधेरीत गोखले उड्डाणपुलाचे पाडकाम! पाच दिवसांत तब्बल २० तासांचा मेगाब्लॉक
  2. Megablock कर्नाक रोड ओव्हर ब्रिज काढण्याचे काम सुरू, २७ तासांचा मध्य रेल्वेचा जम्बो ब्लॉक
  3. Local Train Running Late : मध्य रेल्वेमुळे रोजच लेट मार्क, उशिरा धावणाऱ्या ट्रेनमुळे प्रवासी संतप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.