ETV Bharat / state

Local Megablock Mumbai : मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक - हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामामुळे मेगाब्लॉक घेतला जाणार आहे अशी, माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Megablock On Sundays
Megablock On Sundays
author img

By

Published : Feb 10, 2023, 6:05 PM IST

Updated : Feb 12, 2023, 7:28 AM IST

मुंबई : रविवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. या मेगा ब्लॉक दरम्यान मध्य रेल्वेवर मेल एक्स्प्रेस गाड्या उशिराने धावतील. तर पनवेल, बेलापूर करीता सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

कुर्ला येथे ट्रेन उशिरा पोहोचतील : मध्य रेल्वेवर उद्या 12 फेब्रुवारी रोजी विद्याविहार आणि ठाणे दरम्यान ५ आणि ६ व्या मार्गावर 11.00 ते 15.30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत 12168 बनारस- लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्स्प्रेस, 12142 पाटलीपुत्र- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 11014 कोईम्बतूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 12294 प्रयागराज- लोकमान्य टिळक टर्मिनस दुरंतो एक्सप्रेस, 11080 गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 11061 छाप्रा - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 12164 चेन्नई - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 12162 आग्रा कॅंटॉंमेंट - लोकमान्य टिळक टर्मिनस लष्कर एक्सप्रेस गाड्या कल्याण ते ठाणे दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि 10 ते 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.

कुर्ला येथून ट्रेन उशिरा सुटतील : लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर गोदान एक्स्प्रेस, 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस -जयनगर एक्स्प्रेस, 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस - तिरुवानंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस, 17222 लोकमान्य टिळक टर्मिनस - काकीनाडा एक्स्प्रेस, 11071 लोकमान्य टिळक टर्मिनस - वाराणसी कामायनी एक्स्प्रेस, 13202 लोकमान्य टिळक टर्मिनस- पटना एक्स्प्रेस, 12619 लोकमान्य टिळक टर्मिनस - मंगळुरू एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण दरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक : पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत (बेलापूर-खारकोपर BSU लाईन वगळून) पनवेल येथून 10.33 ते 15.49 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 09.45 ते 15.12 वाजेपर्यंत पनवेल बेलापूर करीता सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. पनवेल येथून 11.02 ते 15.53 वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि 10.01 ते 15.20 वाजेपर्यंत ठाणे येथून पनवेलकडे जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर आणि खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी भागावर विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी, नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

हेही वाचा - Kasba By Poll Election: मला मुस्लिम मतांची गरज नाही, हिंदूंच्या मतांवर विजयी होणार- आनंद दवे

Last Updated : Feb 12, 2023, 7:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.