मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई मधील शिवसेना आमदारांची बैठक सुरू झाली आहे. सह्याद्री अतिथी गृहात सुरू असलेल्या या बैठकीला आमदार सुनील प्रभू, सुनील राऊत, रवींद्र वायकर, रमेश लटके, प्रकाश सुर्वे, सदा सरवनकर हजर आहेत. रखडलेली कामे आणि त्याला लागणार निधी याचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबतही होणार बैठक -
आमदारांच्या बैठकीनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबतही बैठक होणार आहे. बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे व कर्मचारी सुहास सामंत व कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला हजर राहणार आहेत.