ETV Bharat / state

शरद पवार मतदान करताच निघाले दुष्काळी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर..

शरद पवार हे सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत.

शरद पवार
author img

By

Published : Apr 30, 2019, 8:11 AM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी मुंबईत मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर ते दुष्काळी सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौर्‍यावर रवाना झाले. राज्यातील दुष्काळात सापडलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी त्यांनी हा दौरा सुरू केला आहे. ते विविध ठिकाणी शेतकरी, स्थानिकांच्या भेटी घेणार आहेत.

लोकसभा निवडणूकीत पवार वयाच्या ७८ व्या वर्षा तब्बल ७९ सभा घेत भाजप सरकारच्या विरोधात रान उठवले. महाआघाडीतील उमेदवारही आपलेच असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसच्या मुंबईतील मुरली देवरा, उर्मिला मातोंडकर आदी उमेदवारांसाठी तर राज्यात विविध ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठीही सभा घेतल्या. वेळोवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात सभा घेत त्यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. मात्र, नरेंद्र मोदी यांना तितक्याच ताकदीने शरद पवार यांनी उत्तरे दिल्याने त्यांच्या टीकेला महत्व उरले नाही, असेही चित्र पाहायला मिळाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ४ एप्रिलपासून राज्यात सभा घेण्यास सुरुवात केली. बहुतेक सभा मोटारीने प्रवास करत केल्या. शिवाय त्यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारासाठी सभा घेतल्याच मात्र, महाआघाडीच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्याने त्याचा फायदा महाआघाडीला होणार असल्याचे चित्र आहे. ८० सभांमध्ये शेवटची सभा काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या प्रचारार्थ झाली. या सभेनंतर पवार यांनी सर्व मतदारसंघांचा आढावाही घेतला.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानंतर शरद पवार थोडी उसंत घेतील असे सर्वांना वाटत होते. मात्र, अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी दुष्काळी दौरा सुरू केला. माझा शेतकरी जगला तर देश जगेल या भावनेतून काम करणारे शरद पवार आज मतदानाचा हक्क बजावून दुष्काळात सापडलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी सोलापूर आणि उस्मानाबाद या दुष्काळी जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत.

Intro:मतदानाचा हक्क बजावून शरद पवार निघाले दुष्काळी जिल्हयाच्या दौर्‍यावर Body:मतदानाचा हक्क बजावून शरद पवार निघाले दुष्काळी जिल्हयाच्या दौर्‍यावर
(फाईल फुटेज वापरावेत)
मुंबई, ता. २९ :
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत मतदानाचा हक्क बजावला मात्र त्याचवेळी ते दुष्काळी जिल्हयाच्या दौर्‍यावर रवाना झाले आहेत.राज्यातील दुष्काळात सापडलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी सोलापुर आणि उस्मानाबाद या दुष्काळी जिल्हयाच्या दौर्‍यावर निघाले असून ते विविध ठिकाणी शेतकरी, स्थानिकांच्या भेटी घेणार आहेत.
लोकसभा निवडणूकीत पवार यांनी तब्बल ८० सभा घेत भाजप सरकारच्या विरोधात रान उठवले. महाआघाडीतील उमेवारही आपलेच असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसच्या मुंबईतील मुरली देवरा, उर्मिला मातोंडकर आदी उमेवारांसाठी तर राज्यात विविध ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठीही त्यांनी सभा घेतल्या. वेळोवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात सभा घेत त्यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. मात्र नरेंद्र मोदी यांना तितक्याच ताकदीने शरद पवार यांनी उत्तरे दिल्याने त्यांच्या टिकेला महत्व उरले नाही असेही चित्र पाहायला मिळाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ४ एप्रिलपासून राज्यात सभा घेण्यास सुरुवात केली. बहुतेक सभा मोटारीने प्रवास करत केल्या. शिवाय त्यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारासाठी सभा घेतल्याच परंतु महाआघाडीच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्याने त्याचा फायदा महाआघाडीला होणार असल्याचे चित्र आहे.८० सभांमध्ये शेवटची सभा कॉंग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या प्रचारार्थ झाली. मात्र त्यानंतर शरद पवार यांनी सर्व मतदारसंघांचा आढावाही घेतला.लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानंतर शरद पवार थोडी उसंत घेतील असं सर्वांना वाटलं होतं परंतु माझा शेतकरी जगला तर देश जगेल या भावनेतून काम करणारे शरद पवार आज मतदानाचा हक्क बजावून दुष्काळात सापडलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी सोलापुर आणि उस्मानाबाद या दुष्काळी जिल्हयाच्या दौर्‍यावर रवाना झाले आहेत.Conclusion:मतदानाचा हक्क बजावून शरद पवार निघाले दुष्काळी जिल्हयाच्या दौर्‍यावर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.