ETV Bharat / state

नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचा आराखडा तयार करा - अमित देशमुख - उस्मानाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बातमी

राज्य शासनाने गेल्या काही दिवसात काही जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बांधण्यास परवानगी दिली आहे. ही महाविद्यालये कोणत्या पद्धतीने बांधण्यात यावीत, किती काळात काम पूर्ण होईल, याबाबत एक आराखडा तयार करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी प्रशासनाला दिले आहेत.

amit deshmukh
अमित देशमुख
author img

By

Published : Mar 30, 2021, 10:09 PM IST

मुंबई - राज्य शासनाने गेल्या काही दिवसात काही जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बांधण्यास परवानगी दिली आहे. ही महाविद्यालये कोणत्या पद्धतीने बांधण्यात यावीत, किती काळात काम पूर्ण होईल, याबाबत एक आराखडा तयार करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी प्रशासनाला दिले आहेत.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रोजेक्ट मॉनिटरींग सिस्टीम युनिटची बैठक आज (दि. 30 मार्च) मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, नाशिक, अलिबाग आणि सातारा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास मंत्रीमंडळ मान्यता दिली आहे. मात्र, प्रत्येक ठिकाणी कोणत्या पध्दतीने महाविद्यालय स्थापन करता येऊ शकेल, याबाबतचा आराखडा तयार करावा, असे निर्देशही वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांनी दिले. तसेच नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बांधण्याचे काम पीपीई मॉडेल, हायब्रीड ॲन्युटी किंवा इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन यांच्याकडून वित्तपुरवठा या कोणत्याही पद्धतीने नियोजन करत असताना यामधील बारकावे शोधण्यात यावेत. या सर्व तत्वांचा अभ्यास करत असताना याला अंतिम स्वरुप देण्याचे काम करुन लवकरच येणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये याबाबतचे सादरीकरण करावे, अशा सूचनाही मंत्री देशमुख यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा - मध्य रेल्वेच्या उन्नत मार्गावर कोरोनाचे सावट; प्रकल्पाचा खर्च 250 कोटींहून अधिक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.