मुंबई - राज्यातील पदवीच्या वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या नीट पीजी या सामायिक प्रवेश परीक्षेची पहिली तात्पुरती गुणवत्ता यादी राज्य सीईटी सेलने आज जाहीर केली आहे. ५ जानेवारी ही नीट-पीजी ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. या गुणवत्ता यादीतील रँकमध्ये राघवेंद्र पंडित हा राज्यातून पहिला आला असून, त्याचा एकूण स्कोअर हा १००२ इतका आहे. तर यश शर्मा हा या रँकमध्ये दुसरा आला असून, त्याचा स्कोअर ९६९ इतका आहे. तर मुलींमध्ये अंकिता राणी ही राज्यात पहिली असून तिचा ९३० इतका स्कोअर आहे.
यासोबतच आज नीट-एमडीएस या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. ही १८ जानेवारी रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेत राज्यात दीपक महाजन याने पहिल्या (१२) रॅंकमध्ये येण्याचा मान पटकावला आहे. त्याचा एमडीएस स्कोअर हा ७४६ इतका आहे.तर दुसऱ्या स्थानावर फैयाज पारधीवाला आला असून त्याचा रेंक १३ असून ७४३ इतका स्कोअर आहे. तर नीट-एमडीएस मध्ये मुलींमध्ये राज्यात प्रियांका रेलन ही पहिली असून तिचा स्कोअर ७२४ इतका आहे.