मुंबई : मुंबईत गेल्या २ महिन्यात गोवर आजाराचा प्रसार (Measles spread in Mumbai) वाढला आहे. आतापर्यंत गोवरमुळे २ मुलांचा मृत्यू (2 children die of measles) झाला आहे. मुंबईमधील ६१ रुग्ण कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आली आहेत. त्यापैकी मंगळवारी ५ रुग्ण आयसीयुमध्ये (5 Measles patients in ICU) असून १ रुग्ण व्हेंटिलेटरवर (1 measles patient on ventilator) आहे. हे सर्व लहान मुले असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. Latest news from Mumbai
५ आयसीयुत १ रुग्ण व्हेंटिलेटरवर : मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यात काही विभागात गोवरची साथ पसरली आहे. गोवंडी येथे गेल्या दोन महिन्यात रुग्णसंख्या वाढली आहे. मागील महिन्यात गोवंडी येथील एका मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काल सोमवारी नळ बाजार येथील एका बालकाचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आढळून आलेल्या ९०८ संशयित रुग्णांपैकी ६१ रुग्ण कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. काल रात्री पर्यंत ६ रुग्ण आयसीयुमध्ये होते. त्यापैकी आज सकाळी २ जणांना आयसीयुमधून सामान्य वार्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र आज दुपारी एका बालकाची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले आहे. यामुळे आयसीयुमधील रुग्णांची संख्या ५ झाली आहे. त्यापैकी १ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. हे सर्व रुग्ण ६ वर्षाखालील आहेत.
रुग्णालयात चांगली सुविधा : कस्तुरबा रुग्णालयात आयसीयुमध्ये चांगली सुविधा आहे. स्वच्छ्ता आहे. खासगी रुग्णालयापेक्षा चांगली सुविधा या ठिकाणी दिली जाते. माझे नातेवाईक मालाड इस्लामिया बाजार येथे राहतात. माझी तीन चुलत भावंडे या रुग्णालयात आयसीयुमध्ये दाखल होते. २, ४ आणि ५ अशी त्यांची वय आहेत. त्यांनी लस घेतली नव्हती. हा व्हायरस आहे. यामुळे ते आजारी पडले. स्थानिक खासगी डॉक्टरकडे गेल्यावर काही तास आराम पडत होता. पुन्हा त्यांना त्रास जाणवत होता. मी त्यांना कस्तुरबा रुग्णालयात आणण्याचा सल्ला दिला. ३ पैकी एका भावाला आयसीयुमधून सामान्य वार्डमध्ये हलवण्यात आले आहे अशी माहिती मेकॅनिकल इंजिनियर चे शिक्षण घेणाऱ्या साहिल इर्शाद बेग याने दिली.
कस्तुरबा रुग्णालयात ही सुविधा : कस्तुरबा रुग्णालयात गोवरच्या रुग्णांसाठी ३ वॉर्ड सुरू करण्यात आले आहेत. या ३ वार्डमध्ये ११० बेडस आहेत. आय सी यु मध्ये १० बेडस असून ५ व्हेंटिलेटर आहेत. सध्याच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्यास अधिक वॉर्ड सुरू करून बेडसची संख्या वाढवण्यात येईल अशी माहिती कस्तुरबा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार यांनी दिली.