ETV Bharat / state

एमबीबीएसचे ६७ विद्यार्थी उद्यापासून महानगरपालिकेच्या वॉररूममध्ये करणार काम - महानगरपालिका वॉर रुम

रुग्णांची वाढती संख्या आणि डॉक्टरांची कमतरता असे चित्र गेल्या काही दिवसांपासून मुंबईत आहे. केईएमसारख्या रुग्णालयात परिस्थिती अत्यंत बिकट आहे. तेव्हा ही समस्या दूर करण्यासाठी पालिकेने एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना कामावर घेण्याचा निर्णय घेतला आहे.

MBBS students
एमएमबीएसचे ६७ विद्यार्थी उद्यापासून महानगरपालिकेच्या वॉररूममध्ये करणार काम
author img

By

Published : Jun 4, 2020, 8:20 PM IST

मुंबई - मुंबईतील कोविड रुग्णालयातील मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना कोविड योध्दा म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात घेतला होता. त्यानुसार विद्यार्थ्यांची पहिली 67 जणांची टीम शुक्रवारपासून सेवेत दाखल होत आहे. ही टीम पालिकेच्या वॉर रूममध्ये काम करणार आहे.

रुग्णांची वाढती संख्या आणि डॉक्टरांची कमतरता असे चित्र गेल्या काही दिवसांपासून मुंबईत आहे. केईएमसारख्या रुग्णालयात परिस्थिती अत्यंत बिकट आहे. 35 रुग्णांसाठी 3 निवासी डॉक्टर काम करत असून त्यांच्यावर ताण पडत असल्याचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. तेव्हा ही समस्या दूर करण्यासाठी पालिकेने एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना कामावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांना 30 हजार रुपये मानधन दिले जाणार असून त्यांची राहण्याची आणि खाण्याचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.

त्यानुसार राज्यभरातील 300 हुन अधिक विद्यार्थी यासाठी पुढे आले आहेत. तर आता पहिल्या टप्प्यात 67 विद्यार्थ्यांची नावे अंतिम करत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली आहे. तर ही नावे पालिकेच्या आरोग्य विभागाला देण्यात आली असून ही पहिली टीम पालिकेच्या वॉर रूममध्ये काम करणार आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान नायर, सायन, केईएममधील 50 च्या आसपास इंटर्न डॉक्टर वॉर रूममध्ये काम करत आहेत. हे डॉक्टर आता रुग्णालयात परतील तर त्यांच्या जागी विद्यार्थी काम करतील, असेही डॉ. जोशी यांनी सांगितले आहे. विद्यार्थ्यांना थेट कोविड रुग्णांच्या सेवेसाठी पाठवणे योग्य ठरणार नाही. त्यांना तेवढा अनुभव नसतो. त्यामुळे त्यांना इतर कामावर रुजू करत अशा कामातून इंटर्न-निवासी डॉक्टरांना मोकळे करत त्यांना रुग्णालयात पुन्हा आणत ताण कमी करणे, हाच यामागचा उद्देश असल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.