ETV Bharat / state

मनसेला आरोप करण्याशिवाय दुसरे कामच नाही - महापौर किशोरी पेडणेकर - मुंबई मनसे बातमी

मनसेच्या संदिप देशपांडे यांच्या आरोपाला उत्तर देताना, कोणी हा आरोप केला आहे. तो कोण आहे, त्यांनी व्हिडिओ दाखवला पण त्याची माहिती द्यायला हवी होती, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या. मला तो व्हिडिओ मिळताच पालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांना पाठवला असून चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मनसेला सध्या काहीच कामच राहिलेले नाही त्यामुळे ते आरोपच करत राहणार, असा टोला लगावला.

महापौर किशोरी पेडणेकर
महापौर किशोरी पेडणेकर
author img

By

Published : Jun 17, 2021, 9:05 PM IST

Updated : Jun 17, 2021, 9:29 PM IST

मुंबई - नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचार होत आहे. त्यात सत्ताधारी आणि ठेकेदार यांचे साटेलोटे असल्याचा आरोप मनसेचे सरचिटणीस संदिप देशपांडे यांनी केला आहे. त्यावर आरोप करणारे कोण आहेत. याची मीडियाने दखल घ्यावी नंतरच त्यांना प्रसिद्धी द्यावी, असा सल्ला देत मनसेला आरोप करण्याशिवाय दुसरे कामच उरलेले नाही, असा टोला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लगावला.

बोलताना महापौर किशोरी पेडणेकर

मनसेचा आरोप

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात गुरुवारी (दि. 17 जून) पत्रकार परिषद घेऊन या संबंधित सर्व पुरावे माध्यमांसमोर सादर केले. यावेळी साकीनाका येथील नालेसफाईचा व्हिडिओ दाखवत, नाल्यातील गाळ नाहीतर डेब्रिजची वाहतूक कंत्राटदारांनी केला आहे, असा आरोप त्यांनी सत्ताधारी शिवसेनेवर केला आहे. मनसेने कुर्ला सीएसटी रोड येथील व्हिडिओ माध्यमांना दाखवला. यामध्ये डंपरमध्ये डेब्रिज भरले जात असून वरच्या थरात गाळ टाकला जात आहे, अशा प्रकाराने डेब्रिजची वाहतूक कंत्राटदारांकडून केली जात आहे. गाळाचे वजन वाढवण्यासाठी कंत्राटदारांकडून हा प्रकार केला जात आहे. त्यामुळे आत्तापर्यंत नालेसफाईमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा दावा मनसे केला आहे. मुंबई महानगरपालिकेत जे वीरप्पन गॅंग बसले आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत महापौर यांनी दाखवावी. मुंबई महापालिकेत वीरप्पन गँगची चौकशी करा, अशी मागणी संदीप देशपांडे यांनी या पत्रकार परिषदेत केली आहे.

मनसेला सध्या कामच नाही, त्यामुळे ते आरोपच करत राहणार

मनसेच्या संदिप देशपांडे यांच्या आरोपाला उत्तर देताना, कोणी हा आरोप केला आहे. तो कोण आहे, त्यांनी व्हिडिओ दाखवला पण त्याची माहिती द्यायला हवी होती, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या. मला तो व्हिडिओ मिळताच पालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांना पाठवला असून चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मनसेला सध्या काहीच कामच राहिलेले नाही त्यामुळे ते आरोपच करत राहणार, असा टोला लगावला.

हेही वाचा - मुंबईकरांवर मालमत्ता कर वाढीचा बोजा लादणार नाही - महापौर

Last Updated : Jun 17, 2021, 9:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.