नवी मुंबई : माथाडी कामगारांचे प्रलंबित असलेल्या प्रश्न सुटण्याची राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज माथाडी कामगारांनी जाहीर संप पुकारला आहे. या संपात सर्व स्तरातील माथाडी कामगार सहभागी झाले आहेत. माथाडी कामगारांच्या राज्यव्यापी संपामुळे नवी मुंबईतील पाचही एपीएमसी मार्केट आज बंद आहेत.
नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन: माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली माथाडी कामगारांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये पहाटे पासूनच भाजीमार्केट सुरू होते.
पाचही मार्केट बंद : माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात हे काम बंद आंदोलन करण्यात आले आहे असे, माथाडी कामगारांचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले. शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांची निवेदने देऊनही याबाबत सरकारने गांभीर्याने विचार केलेला नाही. आज संपूर्ण एपीएमसी मार्केट बंद असून व्यापाऱ्यांनी देखील पाठिंबा दिला असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले. यावेळी एपीएमसी मधील भाजी मार्केट, फळ मार्केट, मसाला मार्केट, कांदा बटाटा मार्केट, धान्य मार्केट हे पाचही मार्केट बंद करण्यात आले आहेत.
काय आहे माथाडीं कामगारांच्या मागण्या : माथाडी मंडळात पुर्णवेळ अध्यक्ष व सचिव यांच्या नेमणुका करणे, माथाडी मंडळाच्या पुनर्रचना करणे व पुनर्रचित माथाडी मंडळावर माथाडी संघाच्या सभासद संख्येच्या प्रमाणात मंडळ सदस्यांच्या नेमणुका करणे, बाजार समितीच्या अनुज्ञाप्तीधारक मापाडीतोलणार कामगारांना बाजार समितीच्या सेवेत घेणे, कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये व अन्य ठिकाणी मालाचे वजन 50 किलो ठेवण्याबद्दलची अंमलबजावणी होणे, शासनाने कृषि उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या फळे, भाजीपाला व कांदा-बटाटा मालावरील नियमन काढण्याचा5 जुलै, 2016 चा शासन अध्यादेश रद्द करणे, कळंबोली स्टील यार्ड व विविध रेल्वे यार्डातील कामगारांच्या प्रश्नांची सोडवणुक करणे आदी कामगारांच्या मागण्या आहेत.
कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या : नवीन सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माथाडींच्या समस्यांविषयी आम्ही वेळोवेळी कल्पना दिली आहे. राज्य सरकार मोठ्या प्रकल्पावर जोर देत आहे. मात्र, कामगार माथाडी कामगारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत. त्या प्रश्नांकडे लक्ष देणं ही गरजेचs आहे. व्यापारांनी या आंदोलनाला आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आहे. माथाडी कामगारांच्या चळवळीमध्ये काही गुंड प्रवृत्तीची लोक आली आहेत. जे खऱ्या माथाडी कामगारांना त्याच्या कामापासून देशोधडीला लावतात. तसेच ते स्वतः खंडण्या वसूल करत आहेत, यामध्ये काही उद्योजक देखील सामील आहेत. काही क्लिअरिंग एजंटनी माथाडी बोर्डाचा गैरवापर केला असून माथाडी बोर्डाचे 100 कोटी पेक्षा जास्त रुपये थकवले आहेत. या संदर्भात माथाडी कामगार त्यांना विचारणा करण्यास गेला असता त्यांना मारहाण करण्यात येत असून त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे देखील नोंद करण्यात येत आहेत अशी, प्रतिक्रिया माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी दिली.
हेही वाचा - Budget 2023 Highlights : बजेटमधून कुणाला काय मिळाले? वाचा, A to Z माहिती