ETV Bharat / state

सोशल मीडियावर फिरणारे ते मेसेज "फेक"; मंत्री अस्लम शेख यांचं स्पष्टीकरण

author img

By

Published : May 26, 2021, 7:45 PM IST

एक जूनला सकाळी सात वाजता राज्य सरकारने घोषित केलेले लॉकडाऊन संपणार आहे. मात्र, त्याआधी राज्यात लॉकडाउन वाढवण्याचे संकेत राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. लॉकडाऊन वाढवण्याबरोबरच राज्य सरकारकडून काही नियमांमध्ये शिथिलता आणण्याचे संकेतही देण्यात आले आहेत.

aslam shaikh
अस्लम शेख

मुंबई - पावसाळा सुरू होण्याआधी राज्य सरकारने हार्डवेअर आणि बांधकाम साहित्याच्या दुकान उघडण्याची मुभा दिली आहे, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, हा मेसेज फेक आहे. राज्य सरकारकडून हार्डवेअर आणि इलेक्ट्रिकल साहित्यांची दुकाने उघडी करण्यास परवानगी नसल्याचे मत्स्य बंदर विकास मंत्री अस्लम शेख यांनी स्पष्ट केले.

याबाबत बोलताना पालकमंत्री अस्लम शेख

तौक्ते चक्रीवादळाचा फटका कोकण किनारोपट्टीला बसला आहे. या वादळात अनेक घरांची पडझड झाली. त्या पडझड झालेल्या घरांची दुरुस्ती करण्यात यावी म्हणून अशाप्रकारचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला असल्याचे या व्हायरल मेसेजमध्ये सांगण्यात आले आहे. मात्र, अद्याप राज्य सरकारने असा कोणताही निर्णय घेतला नाही. घरावरचे पत्रे विकणारी दुकाने सुरू आहेत. मात्र, अद्याप हार्डवेअर आणि इलेक्ट्रिकल साहित्यांची दुकाने उघडी करण्यास परवानगी नसल्याचे मत्स्य बंदर विकास मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.

एक जूनला सकाळी सात वाजता राज्य सरकारने घोषित केलेले लॉकडाऊन संपणार आहे. मात्र, त्याआधी राज्यात लॉकडाउन वाढवण्याचे संकेत राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. लॉकडाऊन वाढवण्याबरोबरच राज्य सरकारकडून काही नियमांमध्ये शिथिलता आणण्याचे संकेतही देण्यात आले आहेत. त्यामध्ये व्यापारी वर्गाला दिलासा दिला जाईल. त्यासाठी टास्क फोर्सची चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, अद्याप राज्य सरकारकडून जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये कोणतेही बदल केले गेले नसल्याचे अस्लम शेख यांनी सांगितले. त्यामुळे सोशल मीडियावर फिरत असणारे हे मेसेज पूर्णपणे फेक असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा - whatsapp ban in india व्हॉट्सअ‌ॅपचे केंद्राला आव्हान, दिल्ली उच्च न्यायालयात याचिका

मुंबई लसीकरण खरेदी केंद्राच्या धोरणामुळे अडकणार -

केंद्राच्या लसीकरणाच्या चुकीच्या धोरणामुळे मुंबईचे लसीकरण अडकण्याची शक्यताही पालकमंत्री अस्लम शेख यांनी वर्तवली आहे. मुंबई महानगरपालिकेकडून लस खरेदी करण्याबाबत ग्लोबल टेंडर काढण्यात आले होते. या टेंडरला सात ते आठ कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, केंद्र सरकारकडून लसींची खरेदीबाबत असलेल्या नियमांमुळे मुंबई महानगरपालिका लस खरेदी करू शकणार नसल्याने मुंबईच्या लसीकरणाची गती कमी होण्याची शक्यता मंत्री शेख यांनी वर्तवली आहे. लसीकरणाबाबत केंद्र सरकारने लवकरात लवकर धोरण तयार केले पाहिजे. त्यामुळे राज्यात लसीकरणाला वेळ देता येईल असेही यावेळी अस्लम शेख यांनी सांगितले.

याबाबत बोलताना पालकमंत्री अस्लम शेख
चक्रीवादळात नुकसान झालेल्या नागरिकांना लवरच मदत देणार -

चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुद्दा मांडणार असल्याचं अस्लम शेख यांनी सांगितले. किनारपट्टीवरील राहणाऱ्या नागरिकांच्या नुकसानाची पाहणी केली. पंचनामे पूर्ण झाले आहेत. या संबंधीची माहिती उद्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवली जाईल, असेही यावेळी त्यांनी सांगितले. तर राज्य सरकारने केलेल्या पंचनाम्याच्या आधारावर केंद्र सरकारनेदेखील मदत जाहीर करणे गरजेचे आहे, असे मत यावेळी अस्लम शेख यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - राहायला जागा नसल्याने महिला रिक्षा टेम्पोमध्येच क्वारंटाईन; गंगापूरमधील घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.