ETV Bharat / state

Love On Instagram : इंस्टाग्रामवरून विवाहित महिलेचे पोलिसासी जुळले सूत; विवाहबाह्य संबंधानंतर महिलेचे पलायन

author img

By

Published : Jul 21, 2023, 4:17 PM IST

Updated : Jul 21, 2023, 4:46 PM IST

इंस्टाग्रामवरून विवाहित महिलेचे पोलीस कॉन्स्टेबलशी सूत जुळल्यानंतर पलायन केल्याची घटना मुंबईत घडली आहे. या प्रकरणी महिलेच्या पतीने आर. ए. के मार्ग पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली आहे.

Love On Instagram
Love On Instagram
महिलेच्या पतीची प्रतिक्रिया

मुंबई : आजकाल सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. तसेच काही लोक त्याचा गैरफायदा देखील घेताना दिसून येत आहेत. अशीच एका घटना मुंबईत घडली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून विवाहित महिलेची पोलीस कॉन्स्टेबलशी ओळख झाली. नंतर ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. सात महिन्यांच्या विवाहबाह्य संबंधानंतर त्या पोलिसाने विवाहित महिलेला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप महिलेच्या पतीने केला आहे. याप्रकरणी आर. ए. के मार्ग पोलीस ठाण्यात विवाहित महिलेची मिसिंग तक्रार घेण्यात आली आहे.

इंस्टाग्रामवर जुळले सूत : राजकुमार (नाव बदलेले आहे ) हे वाहन चालक असून त्यांचे सात वर्षांपासून एका तरुणीशी प्रेम संबंध होते. नंतर राजकुमारने आपल्या प्रेयसीसोबत लग्न करून दीड वर्षांपूर्वी संसार थाटला. मात्र, या संसाराला नजर लागली. सध्या सोशल मीडियाचा पगडा प्रत्येक नागरिकावर आहे. तसाच सोशल मीडियाचा प्रभाव राजकुमारच्या पत्नीवर देखील आहे. राजकुमारची पत्नी इंस्टाग्रामवर सक्रिय असते. या Instagram वरूनच तिची ओळख पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या राजेंद्र मांडे ( नाव बदलेले आहे) या व्यक्तीशी झाली, अशी माहिती तक्रारदार राजकुमारने ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

इंस्टाग्रामवरून ओळख झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलने पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवले अशी तक्रार आली आहे. तक्रारदाराला सहकार्य करून चौकशी केल्यानंतर कारवाई करण्यात येईल - पोलीस उपायुक्त प्रशांत कदम

पत्नी मिंसिंगची तक्रार : राजकुमारच्या पत्नीचे पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र यांच्यासोबत विवाहबाह्य संबंध प्रस्थापित झाले. दीड वर्षांचा संसार केवळ सात महिन्यांच्या विवाहबाह्य संबंधाने संपुष्टात आला. सात महिन्यांच्या प्रेम संबंधानंतर राजकुमारची पत्नी पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र यांनी फूस लावल्याने सकाळी सकाळी घर सोडून निघून गेली. याबाबत तिने पतीला कोणतीही माहिती दिली नव्हती. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आपली पत्नी पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या राजेंद्रसोबत कुठे, कुठे गेली याचा पुरावा मिळाला. पोलीस कॉन्स्टेबलच्या विवाहबाह्य संबंधबाबत पुरावे मिळाल्यानंतर राजकुमारने आर. ए. के मार्ग पोलीस ठाणे गाठले. मात्र त्याला तिथे हवी तशी मदत मिळाली नाही. पोलिसांनी राजकुमारची पत्नी हरवल्याची तक्रार दाखल केली.

पतीला धमकी : आपल्या बायकोला फूस लावणाऱ्या पोलिसावर कारवाई व्हावी म्हणून वाहन चालक असलेल्या राजकुमारने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तासंतास बसून भेटी घेतल्या. मात्र काही निष्पन्न झाले नाही. राजेंद्र यांनी मित्रांमार्फत राजकुमार यांना धमकी देण्यास सुरुवात केली. या धमकीबाबत भोईवाडा पोलीस ठाण्यात एनसी ( अदखलपात्र गुन्हा ) तक्रार घेण्यात आली.

पत्नीने केला विश्वासघात : या प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबलचा सहभाग असल्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे का? असा सवाल तक्रारदार राजकुमारने केला आहे. राजकुमारने ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, ईटीव्ही भारतशी बोलल्यानंतर पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी मला लेखी तक्रार देण्यास सांगितली. त्यानुसार मी लेखी तक्रार दिली आहे. आता मला केवळ पोलिसांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. माझ्या पत्नीने विश्वासघात करून फसवणूक केली आहे. मात्र, पोलीस कॉन्स्टेबलवर देखील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी माझी मागणी आहे.

हेही वाचा - Satara Crime News : पाटण तालुक्यात एकाच कुटुंबातील चौघांचे घरात आढळले मृतदेह; आत्महत्या की घातपात?

Last Updated : Jul 21, 2023, 4:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.