ETV Bharat / state

दहावी उत्तीर्ण होण्याचे अर्धवट राहिलेले स्वप्न चेंबूरच्या दाम्पत्याने असे केले पूर्ण - Mumbai

चेंबूरच्या घाटला येथील एका दाम्पत्याने त्यांचे दहावी उत्तीर्ण होण्याचे अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण केले आहे. नीलम पारधे आणि संतोष पाडळे असे या दाम्पत्याचे नाव आहे.

नीलम पारधे
author img

By

Published : Jun 8, 2019, 11:57 PM IST

मुंबई - चेंबूरच्या घाटला येथील एका दाम्पत्याने त्यांचे दहावी उत्तीर्ण होण्याचे अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण केले आहे. पत्नी गावात असलेल्या न्यू इरा रात्रशाळेत दहावीचे धडे गिरवायची. रात्री‍ घरी गेल्यानंतर तेच धडे आपल्या पतीला शिकवायची. दिवसभर दोघेही कामधंदा करत रात्रीला अभ्यास करायचे. त्यातूनच दोघांचीही दहावीच्या परीक्षेची तयारी झाली. आज ते दोघेही दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. १४ वर्षांपूर्वी दहावीचे अर्धवट राहिलेले स्वप्न दोघांनीही पूर्ण केले आहे.

नीलम पारधे

नीलम पारधे (आईकडील नाव) असे दहावीत रात्रशाळेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थीनीचे तर संतोष पाडळे असे विद्यार्थ्याचे नाव आहे. नीलमला रात्रशाळेत शिकून ५४.८० टक्के मिळाले. तर कोणत्याही शाळेत तसेच शिकवणीला न जाता केवळ आपल्या पत्नीने जे शिकवले त्याचा अभ्यास करून संतोषने ४० टक्के गुण मिळवून दहावी उत्तीर्ण होण्याचे अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण केले आहे.

१४ वर्षापूर्वी नववीनंतर नीलमचे शिक्षण सुटले होते. पतीचीही तीच कथा होती. परंतु पुन्हा शिकण्याची जिद्द या दोघांच्याही मनात आली. त्यानंतर नीलमने न्यू इरा रात्रशाळेत प्रवेश घेतला आणि संतोषने मानखुर्दच्या एकविरा विद्यालयातून १७ नंबरचा अर्ज भरून दहावीची परीक्षा देण्यासाठी मनाची तयारी केली आणि दोघेही दहावीत यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले.
नीलम यांनी आपल्या यशाची कथा सांगताना आपल्याला पतीसह सासूनेही मदत केल्यामुळे दहावीत उत्तीर्ण होता आल्याचे सांगितले. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात निंबवी नावाच्या गावी निलम पारधे हिचे नववीपर्यंतचे शिक्षण आजीजवळ असताना झाले होते. आई-वडील मुंबईत होते. ती नववीनंतर मुंबईला आली आणि महिन्यांतच लग्न झाले. त्यामुळे तिचे शिक्षण सुटले. तिला १२ वर्षाची मुलगी आणि ९ वर्षांचा मुलगा आहे.

नीलम सकाळी एका ठिकाणी नोकरी करून दुपारी गोवंडीतील एका शाळेत मदतनिसाचे काम करते. हे करत असतानाच तिला आपणही दहावी उत्तीर्ण झाले पाहिजे असे तिला वाटले. त्यातून तिने सप्टेंबर महिन्यात न्यू इरा रात्र शाळा गाठली आणि थेट १४ वर्षांनंतर पुन्हा शाळेत पाऊल टाकले. पतीही नोकरी करून रात्री यायचे आणि मी रात्रशाळेत जे शिकायचे तेच त्यांना शिकवायचे. आता आम्ही दोघेही उत्तीर्ण झालो असून पुढे आम्हाला खूप शिकायचे असल्याची प्रतिक्रिया नीलमने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

Intro:'ती' रात्रशाळेतील 'धडे' घरी जाऊन नव-याला शिकवायची; दहावीच्या परीक्षेत दोघांनीही घेतली यशस्वी भरारी !!Body:'ती' रात्रशाळेतील 'धडे' घरी जाऊन नव-याला शिकवायची; दहावीच्या परीक्षेत दोघांनीही घेतली यशस्वी भरारी !!

(यासाठी मोजोवर नीलम यांचा बाईट आणि शाळेचे काही व्हीज्वल हे मोजोवर पाठवत आहे)
मुंबई , ता. ८ :
चेंबूरच्या घाटला गावात असलेल्या न्यू इरा रात्रशाळेत ती दहावीचे धडे शिकायची. रात्री‍ घरी गेल्यास तेच धडे आपल्या पतीला शिकवत. दिवसभर दोघेही कामधंदा करत रात्रीला अभ्यास करायचे पण सर्व काही पत्नी शिकवायची त्यातूनच दोघांचाही दहावीच्या परीक्षेची तयारी झाली. आज ते दोघेही दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. १४ वर्षांपूर्वी दहावीचे अर्धवट राहिलेले स्वप्न दोघांनीही पूर्ण केले आहे.
नीलम पारधे (आईकडील नाव)असे दहावीत रात्रशाळेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थीनीचे तर संतोष पाडळे असे विद्यार्थ्याचे नाव आहे. नीलमला रात्रशाळेतून ५४.८० टक्के तर कोणत्याही शाळेत,क्लासेसमध्ये न जाता केवळ आपल्या पत्नीने जे शिकवले त्यावरच आधारीत अभ्यास करून संतोषने ४० टक्के गुण मिळवून दहावी उत्तीर्ण होण्याचे अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण केले आहे.
१४ वर्षांपूर्वी नववीनंतर नीलमचे शिक्षण सुटले होते. पतीचीही तीच कथा होती. परंतु पुन्हा शिकण्याची जिद्द मनात आली. दोघांनीही सप्टेंबर महिन्यात मनाची तयारी केली. नीलमने न्यू इरा रात्रशाळेत प्रवेश घेतला आणि संतोषने मानखुर्दच्या एकविरा विद्यालयातून१७ नंबरचा अर्ज भरून दहावीची परीक्षा देण्यासाठी मनाची तयारी केली आणि दोघेही दहावीत यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले.
नीलम यांनी आपल्या यशाची कथा सांगताना आपल्याला पतीसह सासूनेही मदत केल्यामुळे दहावीत उत्तीर्ण होता आल्याचे सांगितले. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात निंबवी नावाच्या गावी निलम पारधे हिचे नववीपर्यंतचे शिक्षण आजीजवळ असताना झाले होते. आई-वडील मुंबईत होते. ती नववीनंतर मुंबईला आली आणि महिन्यांतच लग्न झाले. शिक्षण सुटले. आता तिला १२ वर्षाची मुलगी आणि ९ वर्षांचा मुलगा आहे. सकाळी एका ठिकाणी नोकरी करून ती दुपरी गोवंडीतील एका शाळेत मदतनिसाचे काम करते. हे करत असतानाच तिला आपणही दहावी उत्तीर्ण झाले पाहिजे असे मनाला वाटत होते, त्यातून तिने सप्टेंबर महिन्यात न्यू इरा रात्र शाळा गाठली आणि थेट १४ वर्षांनंतर पुन्हा शाळेत पाऊल टाकले. पतीही नोकरी करून रात्री यायचे आणि मी रात्रशाळेत जी शिकून जायचे तेच त्यांना शिकवायचे आता आम्ही दोघेही उत्तीर्ण झालो असून पुढे आम्हाला खूप शिकायचे असल्याची प्रतिक्रिया नीलमने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. तर संतोष पाडळे यांनी याविषयी आपण काहीही बोलणार नसल्याचे सांगितले.
Conclusion:'ती' रात्रशाळेतील 'धडे' घरी जाऊन नव-याला शिकवायची; दहावीच्या परीक्षेत दोघांनीही घेतली यशस्वी भरारी !!

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.