मुंबई markets hit record : मुंबई शेअर बाजारानं प्रथमच 73,000 चा टप्पा ओलांडला. तर निफ्टीने 22,000 चा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे शेअर बाजारात उत्साहाचं चित्र आहे. मुंबई शेअर बाजाराकरिता आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळच्या सत्रात 720.33 अंकांनी वधारून 73,288.78 वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक 187.4 अंकांनी वधारून 22,000 चा टप्पा ओलांडला आहे. त्यानंतर शेअर बाजारानं 22,081.95 हा आजपर्यंतचा सर्वोच्च निर्देशांक गाठला.
- मुंबई शेअर बाजारात विप्रोचे शेअर सुमारे 11 टक्क्यांनी वधारले. विशेष म्हणजे विप्रोच्या नफ्यात 11.74 टक्के घट होऊन ही कंपनीचे शेअर वधारले आहेत. डिसेंबरपर्यंतच्या तिमाहीत विप्रोनं 2,694.2 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे.
या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले- टेक महिंद्रा, एचसीएल टेक्नॉलीजीस, इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सीज सर्व्हिसेस, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी बँकेचे शेअर वधारले आहेत. एचसीएल टेक्नॉलीज कंपनीचा तिमाहीत नफा 6.2 टक्क्यांनी वाढला आहे. तर निव्वळ नफा हा 4,350 कोटी रुपये झाला. हा आजपर्यंतचा तिमाहीतील सर्वाधिक नफा आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर, बजाज फायनान्स, एनटीपीसी आणि एशियन पेंट्स कंपनीचे शेअर घसरले आहेत.
विप्रोच्या नफ्यात घसरण- आयटी कंपन्यांचे शेअर वधारल्यानं शेअर बाजारात सकारात्मक चित्र आहे. आयटी निर्देशांकातील कंपन्यांचे शेअर 5 टक्क्यांनी वधारले आहेत. आशियातील शेअर बाजारात सेऊल, टोकियो आणि शांघाय शेअर बाजारातही शेअर बाजाराचा निर्देशांक वधारला. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या बाजारात क्रूड ऑईलचे दर हे 0.24 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल हे 78.48 डॉलरपर्यंत पोहोचले आहेत. रिलायन्स सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक विकास जैन यांनी म्हटलं की, विप्रोची स्पर्धक कंपनी असलेल्या इन्फोसिसच्या नफ्यात 7.3 टक्क्यांची घट झाली आहे. तर टीसीएसच्या नफ्यात 8.2 तर एचसीएलच्या नफ्यात 6.2 टक्के वाढ झाली आहे. सलग चौथ्या तिमाहीत विप्रोच्या नफ्यात घसरण झाली आहे.
हेही वाचा :
1 मुंबई शेअर बाजारासह निफ्टीनं गाठला आजपर्यंतचा सर्वोच्च निर्देशांक, जाणून घ्या सविस्तर
2 UNION BUDGET 2022 : शेअर बाजार गुंतवणूकदार आणि बाजार तज्ज्ञांकडून अर्थसंकल्पावर संमिश्र प्रतिक्रिया