ETV Bharat / state

Hindu Organizations March Mumbai : लव जिहाद विरोधात कायदा करा; हिंदू संघटनेचा मुंबईत महामोर्चा

लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी मुंबईत आज (रविवारी) 'हिंदू धर्म रक्षण विराट मोर्चा' आयोजित करण्यात आला होता. दादर येथील शिवाजी पार्क येथून सुरू झालेल्या मोर्चाचे रूपांतर परळ येथील कामगार मैदानात सभेत झाले.

Hindu Organizations March Mumbai
हिंदू संघटनेचा मुंबईत महामोर्चा
author img

By

Published : Jan 29, 2023, 4:27 PM IST

हिंदू मोर्चात बोलताना आंदोलक

मुंबई : सकल हिंदू समाजाकडून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते समाविष्ट झाले होते. यावेळी भगवे झेंडे आणि श्रीरामच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. परंतु कुठल्याही जाती-पाती आणि राजकारणाचा हा मोर्चा नसताना या मोर्चाला हजेरी लावणारे भाजप नेते या मोर्चात आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. लव जिहाद संदर्भात लवकरात लवकर कायदा अस्तित्वात करावा, त्याचबरोबर वाढणाऱ्या लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर कायदा करण्यात या अशी प्रमुख मागणी करत, सकल हिंदू समाजातर्फे मुंबईतील शिवाजी पार्क येथून हिंदू जन आक्रोश महामोर्चाचे आयोजन केले होते.

श्रद्धा वाळकर हत्याकांड चर्चेला : मुंबई व आसपासच्या परिसरातील भागातून हजारोंच्या संख्येने हिंदू समाजाचे लोक यात सहभागी झाले होते. हातात भगवे झेंडे आणि श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दमदमुन गेला होता. लव जिहाद व धर्मांतर विरोधी कायदा लवकरात लवकर करण्यात यावा, ही प्रमुख मागणी करत हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. शिवाजी पार्क येथून निघालेल्या या मोर्चाचे परळ येथील कामगार मैदानात एका मोठ्या सभेत रूपांतर झाले. यावेळी अनेक भाषणे करण्यात आली. विशेष करून श्रद्धा वाळकर हत्या प्रकरणानंतर लव जिहाद मुद्दा पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आला आहे. लव जिहाद संदर्भात कडक कायदा अस्तित्वात आणावा तसेच धर्मांतर विरोधी कायदा तयार करण्यात यावा, या मागण्या याप्रसंगी मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या.

भाजप नेते मोर्चात सहभागी : लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा, ही मागणी या मोर्चेकऱ्यांनी लाऊन धरली होती. विशेष म्हणजे, हा मोर्चा कुठल्याही जातीपाती आणि राजकारणी नेत्यांचा नसल्याचा हवाला सकल हिंदू समाजाचे नेते देत होते. मग अशा परिस्थितीत या मोर्चाला उपस्थित झालेले मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशीष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार नितेश राणे, खासदार मनोज कोटक हे या मोर्चात आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. तसेच मोर्चात लव जिहादमध्ये अडकलेल्या मुलींचे कुटुंब आणि ज्यांना फसवण्यात आलेले आहे, अशा काही पीडिताही सहभागी झाल्या होत्या.

हेही वाचा : Vasudev Balwant Phadke Death Anniversary : आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके पुण्यतिथी, जाणून घेऊया त्यांच्या जीवनाविषयीच्या महत्वाच्या गोष्टी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.