ETV Bharat / state

मराठी कामगार सेनेच्या महेश जाधवांचा अमित ठाकरेंवर मारहाण केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण? - Mahesh Jadhav beating

मनसेच्या 'मराठी कामगार सेनेचे' अध्यक्ष महेश जाधव यांनी फेसबुक लाईव्ह करून आपल्याला मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप केलाय. जाधव यांनी फेसबुक लाईव्ह करत हा आरोप केलाय. यामध्ये जाधव यांच्या कपाळावरून रक्त येत असल्याचं दिसतंय.

Marathi Kamgar Sena and MNS Controversy
मराठी कामगार सेनेच्या महेश जाधवांचा अमित ठाकरेंवर मारहाण केल्याचा आरोप
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 9, 2024, 7:58 PM IST

मनसेच्या 'मराठी कामगार सेनेचे' अध्यक्ष महेश जाधव यांच फेसबूक लाईव्ह आणि मनसे प्रवक्ते योगेश चिले यांनी मांडली भूमिका

मुंबई : Mahesh Jadhav beating : माथाडी कामगार सेनेचे महेश जाधव यांनी अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. त्यानंतर आता मनसेमध्ये मोठा वाद निर्माण झाल्याचं चित्र निर्माण झालंय. आपल्याला अमित ठाकरे यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप जाधव यांनी केलाय. यानंतर तत्काळ, मनसेकडून या घटनेची दखल घेण्यात आली असून, बाळा नांदगावकर यांच्या सहीने एक्स (ट्विटरवर) एक पत्र प्रसिद्ध करण्यात आलंय. त्यामध्ये मराठी कामगार सेनेची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून हकालपट्टी करण्यात येत असल्याचं जाहीर केलंय.

  • सर्व महाराष्ट्र सैनिकांना कळविण्यात येत आहे की, सन्मा. राजसाहेबांच्या आदेशानुसार 'मराठी कामगार सेना' ह्या संघटनेची आणि त्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे. pic.twitter.com/YoDMgt1EQG

    — MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) January 9, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नेमक काय घडलं? महेश जाधव यांनी आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये म्हटलय, 'मी 800 माथाडी कामगारांचा प्रश्न सोडवत होतो. मात्र, हे कामगार ज्या बिल्डरसाठी काम करत होते, त्या बिल्डरचे आणि अमित ठाकरे यांचे संबंध आहेत. या बिल्डरसोबत अमित ठाकरे यांनी मला सेटलमेंट करायला सांगितली. मी या कामगारांसोबतच राहणार अशी भूमिका घेतल्याने, अमित ठाकरे यांनी त्यांच्या बिल्डर मित्रांच्या मदतीने मला राजगड या पक्ष कार्यालयात बोलावून घेतलं आणि मारहाण केली असा आरोप केलाय. जाधव बोलत असताना त्यांच्या तोंडात आणि डोक्यावरून कपाळावर रक्ताचे ओघळ आलेत असं दिसतय.

राज ठाकरे आणि अमित ठाकरे जबाबदार : यामध्ये जाधव म्हणालेत, उद्या माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं, तर त्याला पूर्णपणे राज ठाकरे, अमित ठाकरे आणि महाराष्ट्र नव निर्माण सेना जबाबदार असेल. तसंच, मी या माथाडी कामगारांना वाऱ्यावर सोडणार नाही. राज ठाकरे, अमित ठाकरे आणि त्यांचा पक्ष फक्त खंडणी गोळा करण्याचं काम करतो असा थेट आरोपही जाधव यांनी केलाय. राज ठाकरे फक्त भाषणांमधून आपण मराठी माणसाच्या बाजूने उभा असल्याचा आव आणतात. पण प्रत्यक्षात मात्र, मराठी माणसाच्या नावाने खंडणी गोळा करतात, असा गंभीर आरोप जाधव यांनी केलाय.

मराठी कामगार सेनेची हकालपट्टी : महेश जाधव यांच्या फेसबुक लाईव्हनंतर राज ठाकरे यांच्या आदेशाने मराठी कामगार सेना आणि महेश जाधव यांच्यावर कारवाई करण्यात आली. मराठी कामगार सेनेची मनसेतून हकालपट्टरी करण्यात येत असल्याचं जाहीर करण्यात आलंय. या संदर्भातील अधिकृत पत्रक महाराष्ट्र नव निर्माण सेनेकडून जाहीर करण्यात आलं असून, यावर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांची स्वाक्षरी आहे.

पक्षाची भूमिका काय : या सर्व प्रकरणावर आता पक्षाच्या वतीने अधिकृत प्रवक्ते योगेश चिले यांनी भूमिका स्पष्ट केली असून, त्यांनी म्हटलय की, 'महेश जाधव यांनीच मराठी कामगारांच्या नावाखाली अनेक बिल्डरांना पत्रं पाठवलीत. यात त्यांनी कामगारांचं मानधन वेळेत देण्यासाठी तगादा लावला. बिल्डर मानधन द्यायला तयार झाले. मात्र, त्यांनी इतर देखील काही मागण्या केल्या. यावर अनेक बिल्डरांनी पक्ष कार्यालयाशी संपर्क साधून, महेश जाधव यांची तक्रार केली. आता देखील तेच झालं. ज्या माथाडी कामगारांचा प्रश्न महेश जाधव सोडवत होते, त्यांच्यासोबतच महेश जाधव सेटलमेंट करत होते. त्यानंतर संतप्त माथाडी कामगारांनी महेश जाधव यांना पक्ष कार्यालयात बोलवून घेतलं आणि त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी अमित ठाकरे उपस्थित असल्याने त्यांनी महेश जाधव यांना वाचवलं. त्यामुळे महेश जाधव राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावर आरोप करत आहेत ते चुकीचे आहेत. परंतु, यापुढे महेश जाधव यांनी राज ठाकरे किंवा अमित ठाकरेंवर अशाप्रकारे आरोप केल्यास, त्यांना मनसेचे कार्यकर्ते चोप देतील, असा इशाराही चिले यांनी दिलाय.

हेही वाचा :

1 ऊसतोड टोळी पळाली म्हणून आदिवासी मजुरांना मुकादमानं ठेवंल डांबून; साताऱ्यात रंगला सुटकेचा थरार

2 सरकार टिकल्यास मंत्रालय सुद्धा गुजरातला नेतील;आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

3 सीईओ महिलेकडून चार वर्षाच्या चिमुकल्याचा गोव्यात खून; मृतदेह सुटकेसमध्ये भरुन गेली कर्नाटकात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.