ETV Bharat / state

Maratha Reservation : मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध - विजय वडेट्टीवार

Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात शिंदे समिती राज्यभरातील कुणबी नोंदी शोधत आहे. कुणबी नोंदी शोधताना शिंदे समितीला ओबीसी समाजाच्या नोंदी आढळून आल्यास त्याची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली.

Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 7, 2023, 8:54 PM IST

विजय वडेट्टीवार यांची पत्रकार परिषद

मुंबई Maratha Reservation : कुणबी नोंदी शोधत असताना शिंदे समितीला ओबीसी समाजाच्या नोंदी आढळल्यास त्याची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. मराठा समाजाला आरक्षणाची टक्केवारी वाढवून आरक्षण दिलं पाहिजे. आरक्षणाला आमचा पूर्वीही विरोध होता, आताही आहे. कुणबी नोंदणीचं काम शिंदे समितीकडं देण्यात आलं आहे. त्यांनी ओबीसींमध्ये समाविष्ट असलेल्या जाती शोधून श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

हिंमत असेल तर, निवडणूक घ्या : ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी पक्षातील घटक पक्षांनी राज्यात भाजपाची लाट असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला. भाजपानेच राज्यात तसा डंका पिटवला. त्यामुळं भाजपात हिंमत असेल तर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊन दाखवाव्या, असं आव्हान वडेट्टीवारांनी भाजपाला दिलंय.

कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध : राज्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास आपला विरोध कायम असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. शिंदे समितीकडून राज्यांमध्ये कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू आहे. दरम्यान, ओबीसींच्या नोंदी आढळल्यास सरकारनं श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडं केली. त्यासोबतच न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींनी जरांगेंच्या भेटीला जायला नको होतं, असं मतही त्यांनी व्यक्त केलंय. राज्यात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी मागणी देखील वडेट्टीवार यांनी केली.

राज्यात दुष्काळ जाहीर करा : आमदारांच्या दिवाळीसाठी सरकार पुढं आहे, पण शेतकऱ्यांच्या दिवाळीचं काय? राज्यात दुष्काळ पडलाय. मात्र, त्याबाबत सरकार फारसं गंभीर दिसत नसल्याची टीका वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर केलीय. तसंच त्यांनी राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केलीय. राज्याच्या तिजोरीतून पीकविमा कंपनीला 13 हजार कोटी रुपये देण्यात आल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय. पीक विम्याचा हिशोब केल्यास शेतकऱ्यांना फारच कमी परतावा मिळत असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच सरकारनं तातडीनं राज्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केलीय.

MPSC उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्ती द्या : 2020 मध्ये MPSC उत्तीर्ण झालेल्या 200 विद्यार्थांना नियुक्ती देण्याची मी मागणी केली आहे. मात्र, त्यांना अद्याप ऑर्डर दिलेली नाही. ते कंत्राटी पद्धतीनं जागा भरत आहेत. परंतू MPSC उत्तीर्ण झालेल्या 200 विद्यार्थांना प्रतीक्षा करायला लावत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. सरकारनं विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नये, त्यांना तत्काळ नियुक्ती द्यावी. हे विद्यार्थी आझाद मैदानात उपोषणाला बसले असून, सरकारचा एकही प्रतिनिधी तिकडं फिरकला नसल्याचा आरोप त्यांनी केलाय.

हेही वाचा -

  1. Sunil Tatkare : शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लोकसभा लढवणार होते; सुनील तटकरे यांचा गौप्यस्फोट
  2. Aditya Thackeray : "सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष कसे शोभतात?"; सदा सरवणकरांच्या अध्यक्ष निवडीवरुन आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल
  3. Shambhuraj Desai on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ समाजात निर्माण करताहेत संभ्रम - शंभूराज देसाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.