ETV Bharat / state

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी समाज आक्रमक, अनेक नेत्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द; जाणून घ्या राज्यात कुठे काय परिस्थिती - मराठा आरक्षण

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी समाज आता आक्रमक झालाय. उपोषणाच्या पाचव्या दिवशी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची तब्बेत खालावली. मात्र त्यांनी कुठलाही उपचार घेण्यास नकार दिलाय.

Maratha Reservation
Maratha Reservation
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2023, 9:41 AM IST

Updated : Oct 29, 2023, 4:50 PM IST

मुंबई Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. त्यांच्या आंदोलनाला आता राज्यभरातून पाठिंबा मिळतोय. सध्या जरांगे पाटील यांची तब्येत खालावली असून, आज त्यांना बोलताना त्रास होत असल्याचं दिसून आलं. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चर्चेला येण्याचं आवाहन केलं. मराठा आंदोलक तुम्हाला कुठेही अडवणार नाहीत, असं ते म्हणाले. राज्यात मराठा आंदोलनादरम्यान कुठे काय परिस्थिती आहे ते जाणून घ्या.

  • बीडमधील चऱ्हाटा फाट्यावर आंदोलकांनी एसटी बस फोडली. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव बीडमधील बस सेवा बंद करण्यात आली आहे.
  • आमदार राजेश पाटील आणि खासदार मंडलिक यांची गाडी मराठा आदोलकांनी अडवली.
  • आरक्षणासाठी लातूर जिल्ह्यात एका माजी सरपंचानं आत्महत्या केली. आरक्षण मिळेपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
  • दौंड दौऱ्यावर आलेल्या खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली. त्यांनतर राऊत यांनी दौंडमधील नियोजत बाईक रॅली रद्द केली.
  • जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील आंकोली मोहोळ येथे आमरण उपोषण सुरू आहे. येथे भैरवनाथ भोसले आणि विष्णू अण्णा पवार गेल्या दोन दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. विष्णू अण्णा पवार हे दिव्यांग असून त्याचं वय ८५ वर्ष आहे. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांचं बीपी आणि शुगर लो आढळलं, मात्र तरीही त्यांनी उपचार घेण्यास नकार दिलाय.
  • आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड असोसिएशननं १ नोव्हेंबर २०२३ रोजी एक दिवसीय बंद पुकारला आहे. या दिवशी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असोसिएशनकडून लाक्षणिक उपोषण करण्यात येईल.

बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनावर ज्येष्ठ कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. 'मराठा आरक्षण मिळावं ही जनभावना आहे. मराठा समाजातील तरुणांचा रोजगारीचा प्रश्न वाढलाय. त्यामुळे आरक्षणाच्या माध्यमातून रोजगार मिळेल, अशी तरुणांना अपेक्षा असणं साहजिक आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सर्वांच्या भावनांचा विचार करून सरकारनं याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे. यासाठी विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाबाबत ज्या काही पूर्तता करायच्या असतील त्या पूर्ण करून लवकरात लवकर आरक्षण द्यावं', अशी मागणी थोरातांनी केली.

मराठा आंदोलनाचा नेत्यांना फटका

  • शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना पुण्यातील एका कार्यक्रमात मराठा तरुणांनी काळे झेंडे दाखवले.
  • मराठा आंदोलक आक्रमक झाल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या शुभारंभाला न जाण्याचा निर्णय घेतला.
  • शुक्रवारी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांचा नियोजित कार्यक्रम रद्द केला होता.

हेही वाचा :

  1. Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावली, मराठा समाज आक्रमक; पाहा व्हिडिओ

Last Updated : Oct 29, 2023, 4:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.