मुंबई: जालनामधील आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचा निर्णय हा मंत्री पातळीवर घेण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. मात्र जर असे सिद्ध झाले तर आपण राजकारण सोडू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलय. आमच्या तिघांपैकी कोणीही लाठीचार्जचा आदेश दिला नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठासून सांगितले. मात्र जर आम्ही आदेश दिला नसल्याचे सिद्ध झाले तर आरोप करणाऱ्यांनी राजकारण सोडावं, असे आव्हानही पवार यांनी विरोधकांना दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा समाजाचे आंदोलन चिघळल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार जे करावे लागेल ते करणारच आहोत. सरकार या प्रश्नाबाबत गंभीर आहे. त्यासाठी टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. ज्या काही त्रुटी आहेत, त्या दूर करण्याच्या सूचना आयोगाला दिल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मनोज जांरंगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात त्यांच्याशी चर्चा झाली आहे. मी स्वतः त्यांच्याशी बोललो आहे. त्यामुळे मराठा समाजाला जे आरक्षण अपेक्षित आहे, ते आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. राज्य सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. मराठा समाजानं याबद्दल निश्चिंत राहावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
-
मराठा आरक्षणविषयी मंत्रिमंडळ उपसमितीने घेतलेल्या निर्णयासंदर्भात आयोजित पत्रकार परिषद https://t.co/EZHvWk66mV
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 4, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">मराठा आरक्षणविषयी मंत्रिमंडळ उपसमितीने घेतलेल्या निर्णयासंदर्भात आयोजित पत्रकार परिषद https://t.co/EZHvWk66mV
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 4, 2023मराठा आरक्षणविषयी मंत्रिमंडळ उपसमितीने घेतलेल्या निर्णयासंदर्भात आयोजित पत्रकार परिषद https://t.co/EZHvWk66mV
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 4, 2023
टास्क फोर्सच्या माध्यमातून सोडवणूक- मराठी समाजासाठी आरक्षण मिळावं म्हणून टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. या टास्क फोर्सला मराठा आरक्षणातील त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. न्यायालयात आरक्षण टिकावे यासाठी सरकार पूर्णपणे गांभीर्यानं काम करत आहे. ओबीसी समाजाला मिळणाऱ्या सवलती मराठा समाजाला देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा असे जातप्रमाणपत्र मिळवण्यात येणाऱ्या अडचणी लवकरच दूर केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. त्यासाठी एक समिती नेमण्यात आल्याचं त्यांनी सांगितले.
जालना येथील लाठीमाराच्या घटने संदर्भात संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर पोलीस अधीक्षकांची बदली करण्यात आली आहे. अन्य दोषींवर कारवाई करण्याबाबत सरकार चौकशी करून निर्णय घेईल-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्यांची माफी- जालना येथील आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज हा निश्चितच असमर्थनीय आहे. त्याचं कुणीही समर्थन करणार नाही. या लाठीचार्जमध्ये जे निष्पाप लोक जखमी झाले, त्यांची आपण माफी मागत असल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. तर आंदोलकांना भडकवणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राजकारण करू नये. लाठीचार्जचे आदेश मंत्री पातळीवरून दिले जात नाही. मात्र, घटनेचे राजकारण होणे, हे योग्य नाही. तसे असेल तर गोवारी हत्याकांडाचे आदेश कुणी दिले? मावळ येथील शेतकऱ्यांवर गोळीबाराचे आदेश कुणी दिले? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे आता वटहुकूम काढण्याची मागणी करत आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर त्यांनी वटहुकूम का काढला नाही? असा सवालही फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला.
हेही वाचा-