ETV Bharat / state

Maratha Reservation Protest : मराठा आंदोलक आक्रमक; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत रात्री उशिरा 'खलबतं'

मराठा आंदोलकांसोबत चर्चा करण्यात शिष्टमंडळाला अपयश आलं. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मंगळवारी रात्री उशिरा बैठक घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Maratha Reservation Protest
संपादित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 6, 2023, 8:20 AM IST

Updated : Sep 6, 2023, 9:58 AM IST

मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळल्यानं राज्य सरकार कोंडीत सापडलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवलेलं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्याशी वाटाघाटी करण्यात अपयशी ठरल्यानं हात हालवत परत गेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर बैठक घेतली. या बैठकीत मराठा आरक्षणावर खलबतं झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंची बैठक : मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवलेलं शिष्टमंडळ रिकाम्या हातानं परतलं. या शिष्टमंडळातील सदस्य असलेले अर्जुन खोतकर यांनी चर्चेची दारं अद्याप खुली असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आजही मराठा आंदोलकांशी चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र शिष्टमंडळ रिकाम्या हातानं परतल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मंगळवारी रात्री उशिरा बैठक घेतली. या बैठकीत मराठा आंदोलनावर खलबतं झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मराठा आंदोलकांबरोबर शिष्टाईत अपयश : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलकांसोबत चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ पाठवलं होतं. मात्र या शिष्टमंडळाला मराठा आंदोलकांसोबत शिष्टाई करण्यात अपयश आलं. या शिष्टमंडळात मंत्री गिरीश महाजन, अतुल सावे, अर्जुन खोतकर, राजेश टोपे आदींनी मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केली. मात्र आपण आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचं जरांगे यांनी यावेळी ठणकावलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडलाला आल्या पावली परत जावं लागलं.

हेही वाचा :

  1. OBC leaders on Maratha quota : मराठा ओबीसी आरक्षणाबाबत ओबीसी नेत्यांची काय आहे भूमिका? जाणून घ्या सविस्तर
  2. Manoj Jarange Patil Ultimatum: शिंदे-फडणवीस सरकारला ४ दिवसांचा अल्टीमेटम देणारे कोण आहेत मनोज जारंगे? जाणून घ्या सविस्तर

Last Updated : Sep 6, 2023, 9:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.