ETV Bharat / state

Maratha Reservation : देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, लाठीहल्ल्यामुळं राजकारण तापलं - आरक्षणाच्या नावाखाली भाजपानं मत मागितली

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जालन्यातील अंतरवली सराटा गावात उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्यानं राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यामुळं मराठा समाजात सरकारविरोधात तीव्र नाराजी पसरली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आता आम आदमी पक्षानं केली आहे.

Maratha Reservation
Maratha Reservation
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2023, 7:40 PM IST

मुंबई Maratha Reservation : जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटा गावात आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज केल्यानंतर विरोधकांनी सरकारवर हल्ला चढवला आहे. ब्रिटिश सरकारच्या काळातही एवढा अत्याचार झाला नसेल तेवढा लोकशाहीत होत असल्याचा आरोप आम आमदमी पक्षानं केला आहे. त्यामुळं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आम आदमी पक्षाच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी केली आहे.

आंदोलनाला वेगळं वळण : मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून ऐरणीवर असून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर आंदोलने झाली. त्यातच आरक्षणाच्या मुद्द्यावरून जालन्यातील अंतरवली सराटा गावात गेल्या तीन दिवसांपासून आंदोलक उपोषणाला बसले होते, मात्र पोलिसांनी आंदोलकांवर लाठीहल्ला केल्यानं आंदोलनाला वेगळं वळण लागलंय.

लाठीचार्ज करणाऱ्यावर कारवाई करा : हक्कांसाठी लढणाऱ्यांवर होणारा लाठीचार्ज अत्यंत दुर्दैवी बाब आहे, याचा आम्ही निषेध करतो. ब्रिटीश सरकारच्या काळात असा अत्याचार होत नव्हता, मात्र लोकशाही असताना असा आत्याचार होत आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी प्रीती शर्मा मेनन यांनी केली आहे.

आरक्षणाच्या नावाखाली भाजपानं मतं मागितली : भाजपानं आरक्षण देण्याच्या गप्पा मारून मते मिळवली. मराठा समाजाची आरक्षणाच्या नावाखाली भाजपा सरकारनं फसवणूक केल्याचा आरोप मेनन यांनी केला आहे. आरक्षणाच्या नावाखाली मराठ्यांना केवळ गाजर दाखवलं जातं. त्यामुळं मराठा समाज आता शांत बसणार नाही. मराठा आरक्षणाचं राजकारण करून भाजपानं सर्वसामान्यांना त्रास देण्याशिवाय काहीही केलं नाही, हे वास्तव असल्याचं मेनन म्हणाल्या. भाजप सत्तेसाठी काहीही करू शकत. हे पुन्हा एकदा भाजपानं जालन्यातील घटनेवरून दाखवून दिलं अशी टीका मेनन यांनी केलीय.

आंदोलकांसह पोलीस कर्मचारीही जखमी : जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर शरद पवार, उदयनराजे यांनी आंदोलकांची भेट घेतली. मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यात आंदोलकांसह पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. अंबड रुग्णालयात जाऊन शरद पवार यांनी जखमींची विचारपूस केली. तसंच सरकारवर पत्रकार परिषदेतून टीका करत घटेनेची चौकशी करण्याची मागणी केली.

हेही वाचा -

  1. Sharad Pawar PC : मुंबईच्या सूचनेवरून मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज - शरद पवारांचा घणाघात
  2. Prithviraj Chavan On Lathicharge : आंदोलन दडपण्याचा आदेश मुंबईतूनच - पृथ्वीराज चव्हाण
  3. Nana Patole On Baton Charge Jalna : राहुल गांधीचं भाषण टीव्हीवर दिसू नये म्हणून गृहमंत्र्यांच्या आदेशानेच लाठीचार्ज - नाना पटोले यांचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.