ETV Bharat / state

25 तारखेला बरं वाईट झालं तर त्याला सरकार जबाबदार असेल - मेटे

मराठा क्रांती मोर्चाच्या पत्रकार परिषदेत विनायक मेटे यांचा महाविकास आघाडी सरकारला इशारा.. मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि नेते मुंबईत येऊ नयेत, यासाठी सरकारचे पूर्ण प्रयत्न आहेत. अजून मराठा समाज शांत आहे, दिल्लीत जसा शेतकरी रस्त्यावर आलाय तशी वेळ आमच्यावर येऊ देऊ नका.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Dec 13, 2020, 3:18 PM IST

Updated : Dec 13, 2020, 9:00 PM IST

मुंबई - मराठा मोर्चा सोमवारी होणार असल्याने त्यासाठी मुंबईत येणारे सर्व रस्ते बंद केले आहेत, सरकार पूर्ण घाबरलेले आहे. मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि नेते मुंबईत येऊ नयेत, यासाठी सरकारचे पूर्ण प्रयत्न आहेत. अजून मराठा समाज शांत आहे, दिल्लीत जसा शेतकरी रस्त्यावर आलाय तशी वेळ आमच्यावर येऊ देऊ नका. घडणाऱ्या परिणामांना महाविकास आघाडी सरकार जबाबदार असणार आहे, असे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे म्हणाले.

मराठा आरक्षणाला न्यायालयामध्ये 25 जानेवारीपर्यंत स्थगिती मिळालेली आहे. राज्यातील पदभरती आणि शिक्षण प्रवेश थांबलेले आहेत. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झालेला आहे. यावर अधिवेशनाच्या एक दिवस अगोदर मराठा क्रांती मोर्चातर्फे आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषद घेत, मराठा आरक्षणाविषयी 25 तारखेला बरे वाईट झाले तर त्याला जबाबदार हे सरकार असेल, असे म्हणत सरकारवर टीका केली आहे.

विनायक मेटे आज पत्रकार परिषदेत म्हणाले की, मराठ्यांचे नुकसान झाले तर त्याला जबाबदार हे महाविकास आघाडी सरकार असणार आहे. उद्या अधिवेशन आहे तर मराठा कार्यकर्ते मुंबईत येत असताना त्यांना ताब्यात घेतले जात आहे. ही दडपशाही आहे, शेतकरी दिल्लीत धडकले तसे मुंबईत मराठा समाज एकवटेल. पोलीस कार्यकर्त्यांवर दबाव आणत आहेत. सरकारला आम्ही सांगू इच्छित आहोत, समाजाचे नुकसान झाले तर उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.

मंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा, अशी देखील मागणी करत मराठा समाजाच्या कोणत्याही नेत्याने ओबीसीमध्ये आरक्षण मागितलेले नाही. तरी सरकारमधील ओबीसी नेते मोर्चे काढत आहेत. वातावरण दूषित करत आहेत, म्हणजेच सरकारला राज्यात शांतता नको आहे. वडेट्टीवार, भुजबळ, शेंडगे हे वातावरण खराब करत आहेत. द्वेष निर्माण करण्याचा कार्यक्रम सरकारने आखलाय का? याचे उत्तर द्यावे. या उलट मराठा समाजाचे नेते मात्र यावर काहीच बोलत नाहीत.

अजित पवार, जयंत पाटील, थोरात, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांना बोलायला काय झाले. 25 तारखेच्या निकालात काही वाईट झाले, तर याला सर्वस्वी राज्य सरकार आणि मराठा समाजाचे मंत्री मंडळातील नेते जबाबदार असतील.

प्रत्येक छोट्या-मोठ्या प्रकारावर ट्विट करणारे नेते आता गप्प का आहेत. मुख्यमंत्री किंवा शरद पवारदेखील याबाबत का बोलत नाहीत. मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक 20 डिसेंबरला मुंबई येथे होईल. त्यात सरकारने काय केले ते पुढे येईल. आपण काय करू शकतो, यावर चर्चा होईल, धरणे करायचं की काय करायचे, याबाबत दिशा ठरवली जाईल.या बैठकीला सर्व समन्वयक नेते मंडळी तसेच अनेक मान्यवर असतील. उद्याच्या अधिवेशनात तरी सगळ्या मंत्र्यांनी चर्चा घडवण्याचे काम केले गेले पाहिजे. सर्व आमदार महोदयांना पत्र लिहिलंय. सर्व आमदारांनी उद्याचे अधिवेशन चालू देता कामा नये. 25 जानेवारीला अपेक्षित निर्णय आला नाही तर अनेक पिढ्यांचे नुकसान होईल, असे मेटे यांनी आज पत्रकार परिषदेत म्हटले.

Last Updated : Dec 13, 2020, 9:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.