ETV Bharat / state

'मराठा फक्त राजकारणापुरतेच उरलेत का?'

मागणी मान्य न झाल्यास आणखी आंदोलक दररोज टप्याटप्याने मुंडन करतील, असा इशारा यावेळी सकल मराठा समाजातर्फे देण्यात आला. मराठा समाजाचे मंत्री आणि आमदार समाजाची बाजू मांडत नाही, असा आरोपही यावेळी आंदोलकांनी केला.

maratha agitation
आझाद मैदानात मराठा तरुणांचे मुंडन आंदोलन
author img

By

Published : Feb 4, 2020, 5:05 PM IST

Updated : Feb 4, 2020, 5:51 PM IST

मुंबई - आझाद मैदानात मराठा समाजातील तरुणांनी सरकारचा निषेध करत आज मुंडन आंदोलन केले. मराठा आरक्षणाअंतर्गत ३ हजार ५०० तरुणांना नियुक्ती देण्यात यावी, ही त्यांची मुख्य मागणी आहे. यासाठी गेल्या ८ दिवसांपासून ते आंदोलन करत आहेत. मराठा फक्त राजकारणापुरतेच उरलेत का? असा उद्विग्न सवाल आता आंदोलक करत आहेत.

आझाद मैदानात मराठा तरुणांचे मुंडन आंदोलन

मागणी मान्य न झाल्यास आणखी आंदोलक दररोज टप्याटप्याने मुंडन करतील, असा इशारा यावेळी सकल मराठा समाजातर्फे देण्यात आला. मराठा समाजाचे मंत्री आणि आमदार समाजाची बाजू मांडत नाही, असा आरोपही यावेळी आंदोलकांनी केला. दरम्यान, सत्ताधारी पक्षाच्या एकाही नेत्याने आंदोलकांची अद्याप भेट घेतली नाही.

हेही वाचा - ठरलंय..! उदयनराजे भोसले राज्यसभेवर?

तीव्र आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये १६ टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली होती. या आरक्षणाविरोधात अनेक याचिका न्यायालयात दाखल आहेत.

हेही वाचा - 'बांगलादेशी घुसखोरांनो तुमच्या देशात निघून जा', मनसे इशारा

Intro:मुंबई |

आझाद मैदानात आठ दिवसापासून सकल मराठा समाजाच्या 3500 तरुणांना मराठा आरक्षण अंतर्गत नियुक्ती मिळावी यासाठी आंदोलन सुरू आहे. आज सरकारचा निषेध करण्यासाठी आठ मराठा आंदोलकांनी मुंडन केले आहे. नियुक्ती झाली नाही तर आणखी आंदोलक दररोज टप्याटप्याने मुंडन करतील असा इशारा सकल मराठा समजातर्फे देण्यात आला आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनीBody:|Conclusion:
Last Updated : Feb 4, 2020, 5:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.