ETV Bharat / state

परदेशातील नोकरीचं आमिष दाखवून तरुणांची फसवणूक; दोघांना अटक

Mumbai Crime News : मुंबई पोलिसांनी परदेशात नोकरी देण्याचं आमिष दाखवून तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीने आतापर्यंत १०० पेक्षा अधिक तरुणांची फसवणूक केली आहे.

Mumbai Police
शेकडो लोकांना लुटले
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 8, 2024, 6:59 PM IST

प्रतिक्रिया देताना पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन

मुंबई Mumbai Crime News : परदेशात नोकरीस जाण्याची इच्छा असलेल्यांची फसवणूक करण्याच्या हेतूने सिल्व्हर ट्रॅव्हल्स, रॉयल ट्रॅव्हल्स अशा निरनिराळ्या नावाने खार, सांताक्रूझ, गोरेगाव, मीरारोड इत्यादी ठिकाणी कार्यालय थाटून बनावट कागदपत्रांच्या आधारे तरूणांना कुवेत, दुबई आणि सिंगापूर येथील वेगवेगळ्या नामांकित कंपनीत नोकरी देण्याचं आमिष दाखवून १०० पेक्षा अधिक तरुणांना फसवलं आहे. याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात (Azad Maidan Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रॉयल ट्रॅव्हल्स नावाच्या कार्यालयात धाड टाकून दोघांना अटक करण्यात आली आहे.

भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : आरोपी शाहिद हुसेन मोहम्मद हुसेन शेख (वय ३९) हा जोगेश्वरी पूर्व येथे राहणारा आहे. आरोपी मोहम्मद नाझीम मोहम्मद शब्बीर मणियार (वय ४४) हा मालाड येथे राहणारा आहे. दोन्ही आरोपी बारावीपर्यंत शिकलेले असून टेलरिंगचा व्यवसाय करतात. त्यांची देखील परदेशात नोकरीसाठी जाण्याची इच्छा होती. त्यावेळी त्यांची देखील अशीच फसवणूक झाली होती. त्यानंतर त्यांनी अशाच प्रकारचा गुन्हा २०१६ मध्ये भांडुप परिसरात केला होता. याप्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी दिलीय.

अशी झाली फसवणूक : परदेशात नोकरीस इच्छुक असलेल्यांची फसवणूक करण्याच्या उ‌द्देशाने सिल्वर ट्रॅव्हल्स, रॉयल ट्रॅव्हल्स अशा वेगवेगळ्या नावाने खार, सांताक्रूझ, गोरेगाव, मिरा रोड इत्यादी ठिकाणी बनावट कागदपत्रांच्या आधारे प्लेसमेंट एजन्सी कार्यालय उघडून, तरूणांना कुवेत, दुबई आणि सिंगापूर या परदेशातील वेगवेगळ्या नामांकित कंपनीत प्लम्बर, वाहनचालक असे छोटे जॉब देण्याचं आमिष दाखवून इच्छुक तरूणांकडून त्यांचे अर्ज जमा करून घेतले.

८० हजार रूपये बँक खात्यावर स्वीकारले : इच्छुक तरूणांना वेगवेगळ्या परदेशातील नामांकित कंपन्यांचे बनावट जॉब ऑफर लेटर आणि संबंधित देशांचा बनावट वर्क हिसा व्हॉट्‌सअप अ‍ॅपद्वारे पाठवला. या तरुणांना ऑफर लेटर देऊन त्यांचा विश्वास संपादन केला आणि प्रत्येकाकडून तब्बल 80 हजार रुपये उकळण्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. तर अनेकांच्या वैद्यकीय चाचण्या देखील करण्यात आल्याचं तपासात समजलं आहे.

हेही वाचा -

  1. कामाचे आमीष दाखवून गुजरामध्ये विक्री, बळजबरीने लग्न अन् सामूहिक बलात्कार; तीन लेकरांच्या आईची करुण कथा
  2. नोकरीचं आमिष दाखवून मैत्रिणीला 63 हजारांना विकलं!
  3. फटाक्याचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार, नराधमाला बेड्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.