ETV Bharat / state

मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे; तक्रारींचे प्रमाण मात्र कमी - मुंबई खड्ड्यांच्या तक्रारी बातमी

मुंबईतील खड्ड्यांची डागडूजी करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेच्यावतीने अ‌ॅपची निर्मिती केली आहे. त्याचबरोबर ट्विटरवरूनही खड्ड्यांबाबतच्या तक्रारींची नोंद केली जाते. त्या तक्रारीवरु खड्डे बुजवण्याचे काम पालिकेकडून करण्यात येते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे खड्ड्याबाबतच्या तक्रारींचे प्रमाण कमी झाले असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे.

potholes in mumbai
मुंबईतील खड्डे
author img

By

Published : Sep 3, 2020, 7:40 PM IST

मुंबई - मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे खड्डे पडलेल्या तक्रारीचे प्रमाण कमी झाले आहे. पालिकेकडे ज्या काही तक्रारी आल्या त्यावर कार्यवाही करत बहुसंख्य खड्डे बुजवल्याचा दावा पालिकेने केला आहे.

मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे, तक्रारींचे प्रमाण मात्र कमी

मुंबईत पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए, एसआरए, पोर्ट ट्रस्ट, रेल्वे आदी प्राधिकरणाच्या अखत्यारीत रस्ते आहेत. पावसाळ्यात या रस्त्यांवर खड्डे पडल्यावर त्यामधून वाहनांना मार्ग काढत प्रवास करावा लागतो. विशेष करून दुचाकींना मार्ग काढताना अपघात होतात. दुचाकी घसरून अपघाताच्या अनेक घटना घटतात त्यात काही जण जखमी होतात तर एखाद्याचा जीवही जातो. पावसाळ्यात पालिकेकडे दरवर्षी हजारोंच्या संख्येने येणाऱ्या तक्रारी यंदाच्या वर्षी कमी झाल्याचे दिसून येत आहे. यावर्षी 433 तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी 380 पेक्षा अधिक तक्रारींची दखल घेत पालिकेने खड्डे बुजवल्याचा दावा केला आहे. त्याच वेळी इतर प्रशासनाकडूनही त्यांच्या रस्त्यावर असलेले खड्डे बजवले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.

मुंबईत रस्त्यावर पडलेले खड्डे बुजबल्याचा दावा सर्वच यंत्रणा करत असल्या तरी आजही रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पाहायला मिळत आहेत. लॉकडाऊन असल्याने आतापर्यंत रस्त्यावरून वाहने कमी प्रमाणात जात होती. आता अनलॉक सुरू झाले असल्याने रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे एखाद्या दुचाकीस्वाराचा अपघात किंवा अपघातात मृत्यू होण्याची भीती असल्याने खड्डे त्वरित बुजवण्याची मागणी केली जात आहे.

खड्डे बुजवण्यासाठी तरतूद

यंदा कोरोनाचे संकट ओढावले असून लाॅकडाऊन असल्याने रस्त्यावर वाहतुकीचे प्रमाण कमी होते. त्यामुळे रस्ते दुरुस्ती, नवीन रस्ते बनवणे ही कामे करता आली. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात खड्ड्यांच्या तक्रारी कमी आल्याचे पालिकेच्या रस्ते विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. खड्डे बुजवण्यासाठी रस्ते विभागाने प्रत्येक वॉर्डला 55 लाख रुपयांची तरतूद यापूर्वीच केली आहे. पालिकेच्या अखत्यारितील 24 विभाग कार्यालयांतर्गत खड्डे बुजवण्यासाठी तरतूद केली असून 207 रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे कामे सुरु केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. इतर प्राधिकरणाच्या रस्त्यावर खड्डे पडल्यास पालिका तेही खड्डे बुजवत असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

एमएमआरडीएकडे तक्रार

मुंबईच्या पूर्व द्रुतगती मार्गावर घाटकोपर ते मुलुंड दरम्यान खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे येथे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. त्याबाबत एमएमआरडीएला तक्रार केली असल्याची माहिती ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी दिली.

हेही वाचा - मुंबई महापालिका विरोधी पक्षनेते पद कुणाला?; उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.