ETV Bharat / state

अमली पदार्थ तस्करीप्रकरणी एजाज खानसह अनेक सेलिब्रेटींची होणार चौकशी

एजाज खानची चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी समन्स बजावण्यात येणार आहे.

author img

By

Published : Apr 1, 2021, 4:42 PM IST

अभिनेता एजाज खानची चौकशी
अभिनेता एजाज खानची चौकशी

मुंबई - अमली पदार्थ तस्करीप्रकरणी अटक करण्यात आलेला अभिनेता एजाज खान याची एनसीबीकडून चौकशी केली जात आहे. एजाज खान याच्याकडून बॉलिवूड व टेलिव्हिजन क्षेत्रातील सेलिब्रिटी व इतर व्यक्तींना अमली पदार्थांचा पुरवठा केला जात असल्याचा दावा एनसीबीकडून करण्यात आलेला आहे.

एजाज खान करत होता अमली पदार्थांचा पुरवठा
यात काही अभिनेते-अभिनेत्री ओटीटी प्लॅटफॉर्मचे मालक आणि अंडरवर्ल्डशी संबंधित असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. तूर्तास एनसीबीकडून अशा व्यक्तींची यादी तयार केली जात आहे. एजाज खानची चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी समन्स बजावण्यात येणार आहे.

हेही वाचा - कोरोनामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षा लांबणीवर

बिग बॉस सीजन 7मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री करून प्रकाशझोतात आलेल्या एजाज खानला या अगोदरही अमली पदार्थ तस्करीप्रकरणी नवी मुंबईतील बेलापूर येथील एका हॉटेलमधून अमली एनसीबीने अटक केली होती. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या दाव्यानुसार एजाज खान हा बॉलिवूड क्षेत्र व टेलिव्हिजन क्षेत्रातील बऱ्याच जणांना त्यांच्या मागणीनुसार अंमली पदार्थांचा पुरवठा करत होता.

हेही वाचा - मुंबईत तंबाखुजन्य हुक्का बनविणाऱ्या कारखान्यावर छापा, एक अटकेत

अमली पदार्थ तस्कर फारुख बटाटा याचा मुलगा शादाब बटाटा व शाहरुख खान या दोन अमली पदार्थ तस्करांना एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. यात त्यांच्या चौकशीमध्ये अभिनेता एजाज खानचे नाव समोर आले होते. मुंबईत या दोन अमली पदार्थ तस्करांकडून जी टोळी चालवली जाते त्याचा एजाज खान हा एक सदस्य असल्याचे एनसीबीला समजले. एजाज खानला जयपूरहून मुंबई विमानतळावर आल्यावर त्याला एनसीबीने ताब्यात घेतले. तब्बल 8 तास चौकशी केल्यानंतर मुंबईतील अंधेरी, लोखंडवाला परिसरामध्ये छापेमारी करण्यात आलेली होती. त्यानंतर एजाज खान याला अटक करण्यात आली आहे. 3 एप्रिलपर्यंत त्याची रवानगी एनसीबी कोठडीत करण्यात आलेली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.