मुंबई - शहराला कोरोना विषाणूंने विळखा घातला असून रस्त्यावर अनधिकृत फेरीवाले व नागरीक गर्दी करत आहेत. सोशल डिस्टंन्स ठेवत नसल्याने त्यांना बसण्यास पालिका प्रशासनाने मनाई केली आहे. शुक्रवारी सायंकाळी मानखुर्दच्या लल्लुभाई वसाहतीत फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी पालिका पथक गेले होते. यावेळी फेरीवाल्यांनी पोलीस व पालिका कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे. याप्रकरणी यास्मिन शेख (वय 40),नवाजुद्दीन शेख (वय 32), सफिया शेख (वय 62) ,यांना अटक करण्यात आली आहे तर अकबर शेख फरार झाला आहे.
कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात 3 मे पर्यंत लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. परंतु मानखुर्दच्या लल्लुभाई वसाहतीत अनधिकृत फेरीवाल्यांनी मात्र नेहमीप्रमाणे विना फेरीवाला क्षेत्रातील पदपथावर मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्री सुरू ठेऊन नियम धाब्यावर बसवले आहेत.अनधिकृत फेरीवाले व नागरिकांकडून संचारबंदीचे वारंवार उल्लंघन होत आहे. त्यामुळे पालिकेचे पथक पोलीस संरक्षणात लल्लुभाई वसाहतीमध्ये इमारत क्रमांक 7 समोर कारवाई करण्यासाठी गेले असता फेरीवाल्याची गाडी जप्त करत असताना फेरीवाल्यांनी विरोध केला. यावेळी पोलिसांनी काठीने प्रसाद देताच फेरीवाल्यांनी पोलिसांनाच मारहाण करण्यास सुरुवात केली.आणि अचानक गोंधळ उडाला.अधिक तपास मानखुर्द पोलीस करीत आहेत.
मानखुर्दच्या लल्लुभाई वसाहतीत फेरीवाल्यांची मुजोरी, कारवाई करणाऱ्या पोलिसांवर उचलला हात
शुक्रवारी सायंकाळी मानखुर्दच्या लल्लुभाई वसाहतीत फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी पालिका पथक गेले होते. यावेळी फेरीवाल्यांनी पोलीस व पालिका कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे.