ETV Bharat / state

व्यावसायिकांसह राजकीय हितसंबंध असणारे लोक काँग्रेस सोडू शकतात - माणिकराव ठाकरे - माणिकराव ठाकरे

काँग्रेसचे काही नेते भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ते नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज माणिकराव ठाकरे बोलत होते.

माणिकराव ठाकरे
author img

By

Published : May 30, 2019, 2:26 PM IST

मुंबई - काँग्रेस ही विचारांची चळवळ आहे. चळवळीसोबत बांधले गेलेले लोक काँग्रेस सोडणार नाहीत. मात्र, व्यवसाय आणि राजकीय हितसंबंध असणारे केवळ १ टक्का लोक काँग्रेस सोडू शकतात, असे माणिकराव ठाकरे म्हणाले. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

पत्रकारांशी संवाद साधताना माणिकराव ठाकरे

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस नेत्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला होता. आता ते भाजपमध्ये जाणार आहेत. तसेच काँग्रेसचे काही नेते भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ते नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज माणिकराव ठाकरे बोलत होते.

वंचित आघाडी काँग्रेससोबत असती तर नक्कीच यश मिळाले असते. वंचित आघाडी वेगळी लढल्याने त्याचा फटका त्यांना व काँग्रेसलाही बसला आहे. मात्र, आता पुन्हा नव्याने विधानसभेला लढणार असल्याचे ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांची मोदी-शाहविरोधी भूमिका आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यासाठी आज राज यांची भेट घेतली. मात्र, विधानसभा निवडणुकीत राज यांना सोबत घ्यायचे का? याबाबतच निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे ते म्हणाले.

राज्य सरकारला मराठा आरक्षणावरून राजकीय स्टंट करायचा होता. त्यामुळे त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचे नाटक केले. त्यामुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिला असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.

माणिकराव ठाकरे यांनी यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. शिवसेनेच्या भावना गवळी यांनी त्यांचा पराभव केला. तसेच महाराष्ट्रात काँग्रेसला फक्त एक जागा मिळाल्याने काँग्रेसने आत्मपरिक्षण करावे, असे बोलले जात होते. असे असतानाही विधानसभेत पुन्हा लढणार असल्याचा विश्वास माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.