ETV Bharat / state

'सरकार आता शेतकऱ्याच्या नरडीचा घोट घेणार काय?' - farmer

पोकरासारख्या योजनेत शेतकऱ्यांचे हित आहे. या योजनेच्या मूळ हेतूला बगल देऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे पाप सरकार का डोक्यावर घेत आहे, असा सवाल माणिक कदम यांनी केला.

kadam
'सरकार आता शेतकऱ्याच्या नरडीचा घोट घेणार काय?'
author img

By

Published : Feb 18, 2020, 4:51 PM IST

Updated : Feb 18, 2020, 5:53 PM IST

मुंबई - राज्यातील शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी सरकार काहीही करत नाही. मात्र, नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी (पोकरा)सारखी योजना बंद करून शेतकऱ्यांच्या नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा घणाघात 'मी शेतकरी आत्महत्या करणार नाही' अभियान प्रमुख माणिक कदम यांनी केला. शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाशी निगडीत योजना बंद पाडून काय साध्य होणार आहे, असा सवालही त्यांनी केला.

'सरकार आता शेतकऱ्याच्या नरडीचा घोट घेणार काय?'

पोकरासारख्या योजनेत शेतकऱ्यांचे हित आहे. या योजनेच्या मूळ हेतूला बगल देऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे पाप सरकार का डोक्यावर घेत आहे, असेही ते म्हणाले. सरकारने मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. भाजप सरकारने सुरू केलेल्या या योजनेद्वारे मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न केले जात होते. शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवून घेणाऱ्या या सरकारने ही योजना बंद करण्याचा घाट घातल्याची टीका कदम यांनी केली.

हेही वाचा - अन्.. विद्यार्थिनी परीक्षा केंद्राऐवजी थेट रुग्णालयात; अपघातामुळे बारावीच्या पहिल्या पेपरला मुकली 'गंगा'

या योजनेतील शेततळे, मोटार, पाईपलाइन, शेळी पालन, कुक्कुटपालन इत्यादी महत्त्वपूर्ण घटक योजना बंद केल्याची माहिती यावेळी कदम यांनी दिली. ही योजना बंद केल्यास शेतकरी रस्त्यावर येईल, असा इशाराही त्यांनी दिला. राज्यातील ५० हजार शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव आणि बेरोजगार तरुणांच्या रोजगारासाठी काम केले. २ हजार २०० संस्था नोंदवून आपापली भाग भांडवल उभे केले आहे.

Last Updated : Feb 18, 2020, 5:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.